न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी (Photo Credit- X)
टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड तीन वेळा आमनेसामने आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, या तिन्ही सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे:
१. २००७ विश्वचषक: पहिल्यांदा झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ १८० धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि १० धावांनी पराभूत झाला.
२. २०१६ विश्वचषक: नागपुरात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने केवळ १२६ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय फलंदाजी कोलमडली आणि अवघ्या ७९ धावांत संपूर्ण संघ गारद झाला. भारताला हा सामना ४७ धावांनी गमवावा लागला.
३. २०२१ विश्वचषक: दोन्ही संघांची तिसरी भेट दुबईत झाली. भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ ११० धावा केल्या. न्यूझीलंडने ८ गडी राखून हे लक्ष्य सहज गाठले.
टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचा दबदबा असला, तरी एकूण टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत ३० सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने १८ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला ११ सामन्यांत यश मिळाले आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. विशेष म्हणजे, या विश्वचषकापूर्वी झालेल्या ५ सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत भारताने मायदेशात न्यूझीलंडचा ४-१ असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या फॉर्मात असून हा आत्मविश्वास फायनलमध्ये कामाला येऊ शकतो.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. टीम इंडियाकडे ८ मार्च रोजी दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध विजयाचे खाते उघडणे. सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ बनण्याचा मान मिळवणे. अहमदाबादच्या लाखो प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर भारतीय संघ हा ‘वर्ल्ड कपमधील शाप’ मोडणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला






