आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक रिकी मार्टिन क्लोजिंग सेरेमनीचे मुख्य आकर्षण असेल, या वृत्ताला आयसीसीने (ICC) अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. मार्टिनने या सोहळ्यासाठी एक विशेष ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ तयार केला असून, भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल. आपली दमदार आवाज आणि स्टेजवरील जबरदस्त उपस्थितीसाठी ओळखले जाणारे रिकी मार्टिन जगभरातील चाहत्यांना एक अविस्मरणीय अनुभव देतील, अशी खात्री आयसीसीने व्यक्त केली आहे.
🎤 The #T20WorldCup party just got bigger! We are thrilled to announce Global Icon and Superstar Ricky Martin as the headliner for the Closing Ceremony before the Final at the ICC Men’s T20 World Cup 2026. This is one celebration you don’t want to miss! 🎶🏏✨#FeelTheThrill… pic.twitter.com/Wi18cfGuFb — ICC (@ICC) March 6, 2026
आयसीसीने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “टी-२० विश्वचषकाची पार्टी आता अधिक मोठी झाली आहे. जागतिक आयकॉन आणि सुपरस्टार रिकी मार्टिन अंतिम सामन्यापूर्वी क्लोजिंग सेरेमनीमध्ये मुख्य आकर्षण असतील, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हा कार्यक्रम मिस करू नका!”
T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला
अंतिम सामन्याच्या दिवशी स्टेडियमचे दरवाजे दुपारी ३:३० वाजता उघडले जातील. त्यानंतर संध्याकाळी ५:३० वाजता रिकी मार्टिन यांच्या सादरीकरणाने सोहळ्याची सुरुवात होईल. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला सुरुवात होईल.
भारतीय संघ एकूण चौथ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. २००७ मध्ये भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. गेल्या विश्वचषकातही टीम इंडिया चॅम्पियन ठरली होती. जर सूर्यासेनेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला, तर सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरेल.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळली होती, परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळी किवी संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.






