Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Vaibhav Sooryavanshi scored Fastest Fifty in 11 balls Against SL A: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका 'अ' विरुद्धच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला. त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद फिफ्टीचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 01:17 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:

 

  • Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी
  • श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले
  • 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करत विश्वविक्रम मोडला. त्याने लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना, वैभवने प्रियांश आर्यासोबत मिळून भारताला एक भक्कम सुरुवात करून दिली. वैभवने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक झळकावत २० वर्षे जुना विक्रम मोडला. यासह, तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज कौशल्य वीरारत्नेच्या नावावर होता, ज्याने १२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

२० वर्षांचा जागतिक विक्रम मोडला

या १५ वर्षीय फलंदाजाने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून इतिहास रचला. त्याने आपल्या डावातील पाचवा षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने जवळपास २० वर्षे जुना विक्रम मोडला. ही खेळी विशेष होती कारण वैभव संपूर्ण मालिकेत संघर्ष करत होता. शिवाय, काही दिवसांपूर्वी श्रीलंका ‘अ’ संघाच्या एका खेळाडूशी झालेला त्याचा वाद चर्चेचा विषय बनला होता. परिणामी, अंतिम सामन्यातील त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच बारीक लक्ष होते. मात्र, वैभवने आपल्या बॅटने टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आणि मोठ्या सामन्यांमध्ये दबावाचे संधीत रूपांतर कसे करायचे हे दाखवून दिले. त्याच्या स्फोटक खेळीने भारत ‘अ’ संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि अंतिम सामन्याचे संपूर्ण वातावरण बदलून टाकले. धमाकेदार अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच, वैभव शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण केवळ सहा धावांनी त्याचे शतक हुकले. वैभवने २९ चेंडूंमध्ये १० चौकार आणि आठ षटकारांसह ९४ धावांची धमाकेदार खेळी केली.

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज

  • वैभव सुर्यवंशी, भारत अ विरुद्ध श्रीलंका अ, दांबुला (2026)- ११ चेंडू
  • कौशल्या वीरारत्ने, रागामा क्रिकेट क्लब विरुद्ध कुरुनेगला युथ क्रिकेट क्लब, थर्स्टन कॉलेज मैदान, कोलंबो (२००५/०६) – १२ चेंडू
  • थिसारा परेरा, श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लब, आर्मी ग्राउंड, पनागोडा (२०२०/२१)- १३ चेंडू
  • रॉरी क्लेनवेल्ड, पश्चिम प्रांत विरुद्ध क्वाझुलु-नताल, सहारा स्टेडियम किंग्समीड, डर्बन (2010/11)- १४ चेंडू

भारताची दमदार सुरुवात

त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत ‘अ’ संघाकडून वैभव आणि प्रियांश आर्य फलंदाजीसाठी मैदानात उतरले. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी सुरू केली. यादरम्यान वैभव आणि प्रियांश या दोघांनाही अनेकदा जीवदान मिळाले, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. वैभव आणि प्रियांश तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने अवघ्या तीन षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडला. वैभव इथेच थांबला नाही आणि त्याने श्रीलंका ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. वैभवने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.

Neeraj Chopra चे दमदार कमबॅक! डायमंड लीगमध्ये चौथ्या स्थानावर; CWG 2026 चे तिकीट पक्के

Web Title: Vaibhav sooryavanshi fastest fifty 11 balls list a cricket world record india a vs sri lanka a final 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India A Team
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?
1

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
2

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
3

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

IND vs SL: घोर अन्याय, नुसता त्रास! बुमराह मालिकेबाहेर; मात्र संधी नाहीच, Mohammed Shami म्हणाला…
4

IND vs SL: घोर अन्याय, नुसता त्रास! बुमराह मालिकेबाहेर; मात्र संधी नाहीच, Mohammed Shami म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.