Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैभव सूर्यवंशीला वरिष्ठ भारतीय संघात नाही मिळणार स्थान, जाणून घ्या आयसीसीचे नियम!

वैभव आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे आणि त्याने त्याच्या वयापेक्षाही जास्त चतुराईने आणि ताकदीने खेळला आहे. चाहत्यांनी आता वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 01, 2025 | 05:24 PM
फोटो सौजन्य - X सोशल मिडीया

फोटो सौजन्य - X सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

वैभव सूर्यवंशी : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याच्या चमकदार खेळाने क्रिकेट चाहत्यांना आणि मोठ्या खेळाडूंना आश्चर्यचकित केले. वैभव आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे आणि त्याने त्याच्या वयापेक्षाही जास्त चतुराईने आणि ताकदीने खेळला आहे.

वैभवला या सीझनमधील सर्वात मोठा उदयोन्मुख खेळाडू मानले जात आहे आणि लोक त्याला क्रिकेटचे भविष्य म्हणू लागले आहेत. त्याच्या तिसऱ्या सामन्यातच, वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. ही बातमी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ज्या वयात बहुतेक मुले शाळेत शिकत असतात, त्या वयात वैभव मोठ्या स्टेडियममध्ये जगातील अव्वल गोलंदाजांचा सामना करत आहे आणि शानदार वेगाने धावा काढत आहे.

पत्नीच्या वाढदिवशी Virat Kohli ची सोशल मीडियावर खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना! म्हणाला – माझ्या सर्वस्वाला…

अनुभवी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी आता वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की वैभवमध्ये भविष्यात एक उत्तम खेळाडू बनण्याची पूर्ण क्षमता आहे. पण त्यांच्या मार्गात एक अडथळा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२० मध्ये एक नियम बनवला, ज्यानुसार कोणताही खेळाडू १५ वर्षांचा होईपर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकत नाही.

वैभव सध्या १४ वर्षांचा आहे आणि २७ मार्च २०२६ रोजी तो १५ वर्षांचा होईल. याचा अर्थ असा की सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही. तथापि, सर्व आशा संपलेल्या नाहीत. आयसीसीच्या या नियमात एक खास गोष्ट म्हणजे जर एखाद्या खेळाडूला पुरेसा अनुभव असेल, मानसिक समज असेल आणि तो शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार असेल तर त्याला वयोमर्यादेपूर्वीही खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे प्रकरण योग्य पद्धतीने आयसीसीसमोर मांडले आणि आयसीसीनेही ते मान्य केले तर वैभवला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते.

IPL २०२५ : आयपीएलमध्ये Sanju Samson च्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट! प्रशिक्षक द्रविडने तोडली चुप्पी, वाचा सविस्तर..

हसन रझा यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन रझा यांच्या नावावर आहे. त्याने आपला पहिला कसोटी सामना केवळ १४ वर्षे २२७ दिवसांच्या वयात खेळला. भारतात हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने १६ वर्षे २०५ दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

Web Title: Vaibhav suryavanshi will not get a place in the senior indian team know the icc rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • cricket
  • indian team
  • IPL 2025
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना
1

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?
2

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
3

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…
4

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.