वरूण चक्रवर्तीची भारतीय संघात एंट्री (फोटो- ians)
नुकतीच आयर्लंड विरुद्ध भारत दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने परभवा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीचे संघात दाखल होणे हे नक्कीच गोलंदाजी मजबूत करणारे असणार आहे. वरुण चक्रवर्तीच्या येण्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या सिरिजसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. मात्र सिरिज सुरू होण्याआधी त्याला दुखापत झाल्याने तो संघाबहेर गेला होता. वरुण चक्रवर्ती संघात नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत पाहायला मिळाली होती. मात्र आता वरुण चक्रवर्ती पूर्णपणे फिट झाल्याचे दिसून येत आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने
‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने
आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून सुरू मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहू शकणार आहेत. तुम्हाला जर मोबाइलवर हे सामने लाईव्ह पहायचे असतील तर ते तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत.
IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व
इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI
बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.






