भारत विरुद्ध इंग्लंड (फोटो- सोशल मीडिया)
भारतीय संघासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारतासमोर तागडे आव्हान देण्याची शक्यता आहे. आयर्लंड विरुद्ध भारताचा पराभव झाल्यामुळे भारताला आत्मविश्वास वाढवण्यासाठी विजयी सुरुवात करावी लागेल. दुबळ्या आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आता भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी दिली नव्हती. यासाठी अनेक कारणे समोर आली होती. मात्र आता संजू सॅमसन आयर्लंडविरुद्ध अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता तरी वैभव सूर्यवंशीला स्थान मिळणार का हे पहावे लागणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडचे सामने कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहेत हे पहावे लागणार आहे.
IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI
कुठे पाहता येणार लाईव्ह सामने?
आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून सुरू मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहू शकणार आहेत. तुम्हाला जर मोबाइलवर हे सामने लाईव्ह पहायचे असतील तर ते तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत.
IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व
इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI
बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.






