Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Half Marathon : दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचा डंका! माताताने मोडला कोर्स रेकॉर्ड, महिलांमध्ये एलेमू अव्वल

Delhi Half Marathon : वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन 2026मध्ये केनियाच्या चार्ल्स माताताने पुरुषांच्या एलिट गटात कोर्स रेकॉर्ड मोडत ऐतिहासिक कामगिरी केली. तर महिलांच्या एलिट गटात इथिओपियाच्या वुदिनेश एलेमूने विजेतेपद पटकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 03:05 PM
Delhi Half Marathon : दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचा डंका! माताताने मोडला कोर्स रेकॉर्ड, महिलांमध्ये एलेमू अव्वल

Delhi Half Marathon : दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचा डंका! माताताने मोडला कोर्स रेकॉर्ड, महिलांमध्ये एलेमू अव्वल

Follow Us
Follow Us:
  • ४० हजार धावपटूंचा सहभाग
  • भारतीय गटात शैलेश आणि अंकिताची बाजी
  • मेरी कोम व टेनिसपटू महेश भूपतींचा पाठिंबा
वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन 2026 (Delhi Half Marathon) मध्ये केनियाच्या चार्ल्स माताताने पुरुषांच्या एलिट गटात कोर्स रेकॉर्ड मोडत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 58 मिनिटे 52 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. महिलांच्या एलिट गटात इथिओपियाच्या वुदिनेश एलेमूने 1 तास 6 मिनिटे 35 सेकंदांची वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड लेबल’ दर्जाच्या या स्पर्धेत राष्ट्रीय राजधानीतील रस्त्यांवर सुमारे 40 हजार धावपटू सहभागी झाले.

माताताने नोंदवलेली वेळ त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही ठरली. पुरुषांच्या शर्यतीत केनियाच्याच सॅमवेल न्यामाई माइलूने दुसरे, तर स्टॅनली वैथाका म्बुरूने तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे पुरुषांच्या एलिट गटातील तिन्ही पदके केनियाच्या धावपटूंनी पटकावली.

एलेमूनची चमकदार कामगिरी

महिलांच्या एलिट गटात इथिओपियाच्या एलेमूने आपल्याच देशाच्या सेला बुसिनेईला मागे टाकत विजेतेपद मिळवले. केनियाच्या सिंथिया चेलंगात चेपक्वोनीने तिसरे स्थान पटकावले. भारतीय एलिट गटात पुरुषांमध्ये शैलेश कुशवाहा, तर महिलांमध्ये अंकिता ध्यानी यांनी विजेतेपद मिळवले.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि वेदांता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मिश्रा यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी व्हाइस अॅडमिरल अतुल आनंद उपस्थित होते. एलिट हाफ मॅरेथॉनसह मास पार्टिसिपेशन हाफ मॅरेथॉन, पोलीस कप, ‘चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी’, ज्येष्ठ नागरिकांची धाव, ओपन 10 किलोमीटर आणि ‘ग्रेट दिल्ली रन’ अशा विविध गटांतील शर्यतीही पार पडल्या.

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

मेरी कोम व टेनिसपटू महेश भूपतींचा पाठिंबा

बॉक्सिंगपटू मेरी कोम, पॅरालिम्पिक बॅडमिंटन विजेता प्रमोद भगत आणि टेनिसपटू महेश भूपती यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. आघाडीचे खेळाडू आणि हौशी धावपटू यांच्या सहभागामुळे या स्पर्धेत क्रीडा उत्कृष्टतेसोबतच सर्वसमावेशक सहभागाचे दर्शन घडले.

या वर्षीच्या स्पर्धेत ‘रन फॉर झिरो हंगर’ या उपक्रमालाही जोड देण्यात आली. सहभागी धावपटूंच्या माध्यमातून यंदा 50 लाख भोजन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. मागील पाच आवृत्त्यांमध्ये या अभियानांतर्गत एकूण 2.7 कोटींहून अधिक भोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. वेदांता समूहाच्या दिल्ली हाफ मॅरेथॉनशी असलेल्या सहभागाची पाच वर्षे पूर्ण झाल्याचेही हे वर्ष विशेष ठरले.

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

वेदांता समूहाच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या अध्यक्ष प्रिया अग्रवाल हेब्बर म्हणाल्या, 40 हजार धावपटू रस्त्यावर उतरल्याने दिल्ली हाफ मॅरेथॉनने क्रीडा उत्कृष्टता, वैयक्तिक दृढनिश्चय आणि सामूहिक प्रयत्नांच्या ताकदीचा उत्सव साजरा केला. आघाडीच्या खेळाडूंपासून ते पहिल्यांदाच धावणाऱ्या सहभागींपर्यंत प्रत्येकाने खेळ आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा कशी देऊ शकतो, हे दाखवून दिले.

दरम्यान, सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. दलाच्या स्थापनेची 61 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 61 पुरुष आणि 61 महिला कर्मचाऱ्यांनी या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेतला. बीएसएफ आणि ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वाइव्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांसह सुमारे 130 जण सहभागी झाले.

बीएसएफचे महासंचालक प्रवीण कुमार यांनीही हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत 2 तास 28 मिनिटे 15 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याने नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली आणि सातत्यपूर्ण आत्मसुधारणेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दलाकडून अशा क्रीडा उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये किती धावपटू सहभागी झाले?

    Ans: या स्पर्धेत सुमारे ४० हजार धावपटूंनी सहभाग घेतला.

  • Que: भारतीय एलिट गटात कोण विजयी झाले?

    Ans: पुरुषांमध्ये शैलेश कुशवाहा आणि महिलांमध्ये अंकिता ध्यानी यांनी विजेतेपद मिळवले.

  • Que: ‘रन फॉर झिरो हंगर’ उपक्रमांतर्गत किती भोजन उपलब्ध करून देण्यात आले?

    Ans: २०२६ च्या आवृत्तीत ५० लाख भोजन उपलब्ध करून देण्यात आले. मागील पाच आवृत्त्यांमध्ये एकूण २.७ कोटींहून अधिक भोजन उपलब्ध करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Vedanta delhi half marathon 2026 charles matata course record rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Marathon
  • Omar Abdullah
  • Rekha Gupta

संबंधित बातम्या

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
1

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.