भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (फोटो -ट्विटर)
भारताची फलंदाजी
भारतीय संघाकडून प्रथम खेळण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा मैदानात आले. मात्र अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात केवळ 6 रन्स करून आउट झाला. त्यानंतर इशान किशन खेळण्यासाठी आला. इशान किशनने 30 रन्सची आक्रमक खेळी केली. तो 30 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. संजू सॅमसन 16 रन्स करून आउट झाला. श्रेयस अय्यर 22 रन्स करून आउट झाला.
वेस्ट इंडिजची गोलंदाजी
आजचा सामना करो या मरो चा असल्याने वेस्ट इंडिजचे गोलंदाज अचूक मारा करताना दिसत होते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्यांच्या कीमो पॉलने अभिषेक शर्माला आउट केले. तर शमार जोसेफने आक्रमक खेळणाऱ्या इशान किशनला आउट केले. वेस्ट इंडिजने शानदार गोलंदाजी करत 6 ओव्हर्समध्ये भारताचे 4 फलंदाज आउट केले.
\
Into the orbit 🚀 Ishan Kishan got the Bengaluru crowd going with a quick-fire 3⃣0⃣(10) 🎇 Updates ▶️ https://t.co/hpGnrNyZVS #TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ishankishan51 https://t.co/CdeDA9r87n — BCCI (@BCCI) October 17, 2026
आजचा शेवटचा टी 20 सामना हा भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो ही सिरीज देखील जिंकणार आहे. आता केवळ 9 ओव्हर्सचा सामना होत असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. तसेच आउटफील्ड देखील ओली असल्याने येथे खेळणे इतके सोपे नसणार आहे.
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.






