विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित(फोटो-सोशल मीडिया)
Vidarbha squad announced for the Vijay Hazare Trophy : २४ डिसेंबरपासून बीसीसीआय आयोजित विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून हर्ष दुबेकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज यश ठाकूरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हे एलिट ग्रुप बी सामने २४ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विदर्भ आपला सलामीचा सामना २४ जानेवारी रोजी बंगालविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत संघ सात सामने खेळतील.
हेही वाचा : Ashes series 2025: पॅट कमिन्सने मोडला मिचेल जॉन्सनचा विक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम
शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) च्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठकीमध्ये संघाची निवड करण्यात आली. हा संघ अनुभव आणि तरुणाईच्या उत्साहाचे संतुलन साधल्याचे दाखवतो. टॉप ऑर्डरमध्ये अथर्व तायडे, ध्रुव शौरे आणि अमन मोखाडे या फलंदाजांचा समावेश असून गोलंदाजी आक्रमणात दर्शन नळकांडे, नचिकेत भुते आणि गणेश भोसले यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. शिवम देशमुख आणि अक्षय वाडकर यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. उस्मान गनी (प्रशिक्षक) आणि धर्मेंद्र अहलावत (सहाय्यक प्रशिक्षक) हे प्रभारी असतील. या स्पर्धेत विदर्भ संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा : ना बुमराह ना हार्दिक… या मालिकेत मिळणार विश्रांती! कोणत्या खेळाडूला मिळणार जागा? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
विदर्भने २०२४-२५ विजय हजारे ट्रॉफीमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी केली बजावली आणि उपविजेतेपद पटकावले होते. संघाने अंतिम सामन्यासह सर्व लीग आणि उपांत्य फेरीचे सामने जिंकण्याची किमया साधली होती. गेल्या हंगामात विदर्भाकडून खेळणारा करुण नायर या वर्षी खेळण्याची शक्यता आहे. कारण तो त्याच्या आठ सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात बाद झाला होता आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक ७७९ धावा करणारा फलंदाज ठरला होता, ज्यामुळे संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यास मोठी मदत झाली होती.
हर्ष दुबे (कर्णधार), यश ठाकूर (उपकर्णधार), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, यश राठोड, शिवम देशमुख (यष्टीरक्षक), अक्षय वाडकर, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे, यश कदम, आर. समर्थ, दिवंगत शुवान, पार्थ शुन्हा, पार्थ शुक्ल, दि. दुबे, गणेश भोसले.
विदर्भाचे सामन्यांचे वेळापत्रक






