Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinesh Phogat: WFI च्या भूमिकेवर न्यायालय नाराज; विनेश फोगाट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

Delhi High Court On Vinesh Phogat: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला देशांतर्गत स्पर्धांसाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरून दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिला मिळाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 04:56 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • WFI च्या भूमिकेवर न्यायालय नाराज
  • विनेश फोगाट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे निरीक्षण
  • न्यायालयाने काय म्हटले?
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला देशांतर्गत स्पर्धांसाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरून दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघ (Wrestling Federation of India) ला कठोर शब्दांत फटकारले. न्यायालयाने शुक्रवारी (दि.२२) सुनावणीदरम्यान महासंघाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

न्यायालयाने काय म्हटले?

सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘खेळाडू आणि संघटना यांच्यातील सुरू असलेल्या वादाचा खेळावर परिणाम होऊ नये. कोणतेही मतभेद असले तरी, कुस्ती आणि खेळाडूंचे हित सर्वोपरि असले पाहिजे.’ सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने WFI च्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आणि विचारले की, ‘पूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिलासा देण्यात यायचा, मग विनेशच्या प्रकरणात वेगळे नियम का?’. न्यायालयाने मान्य केले की विनेश फोगाट सध्या प्रसूती रजेवर आहे. परंतु, खेळाडूंच्या वैयक्तिक परिस्थितीचा तसेच खेळाच्या आणि देशाच्या हिताचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

न्यायालयाने सांगितले की, ‘या देशात मातृत्वाचा आदर केला जातो आणि कोणत्याही क्रिडा संघटनेने सूडाच्या भावनेतून कारवाई करू नये.’ न्यायालयाने, केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या ट्रायलमध्ये विनेशला सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

भारतीय कुस्ती महासंघने विनेश फोगाटला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अपात्र घोषित केले होते. महासंघाच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीनंतर पुनरागमन करताना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग [ United World Wrestling (UWW)] आणि इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी [International Testing Agency (ITA)] यांच्या अँटी-डोपिंग नियमांनुसार खेळाडूंना सहा महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. यानंतर विनेशने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून WFI चा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

विनेशला महासंघाने अपात्र ठरवले

१८ मे रोजी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने विनेश फोगाटला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. दरम्यान,WFI ने अलीकडेच विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तिला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास अपात्र ठरवले होते. विनेशने या नोटीसला आव्हान दिले होते, ज्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुन्हा वाद

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीपूर्वी वजन निकष पूर्ण न झाल्याने विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये तिने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी पुनरागमनाची घोषणा केली.

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट

Web Title: Vinesh phogat wfi delhi high court controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Sports News
  • Vinesh phogat
  • Vinesh Phogats Disqualification

संबंधित बातम्या

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली
1

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क
2

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर
3

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट
4

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.