CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे क्रिकेट संचालक मो बोबत यांनी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्धच्या लीग स्टेज सामन्यासाठी कर्णधार रजत पाटीदारच्या उपलब्ध असल्याची पुष्टी केली. ते म्हणाले, “रजत आता पूर्णपणे फिट आहे. आम्ही त्याच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगली आणि कोणतीही जोखीम घेतली नाही. आम्ही त्याला बरे होण्यासाठी आणि विश्रांतीसाठी आणखी थोडा वेळ देण्याचा विचार केला होता, पण तो आता प्रॅक्टिस करत आहे आणि खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’ प्लेऑफपूर्वी कर्णधाराचे पुनरागमन हे आरसीबी साठी मोठे बूस्ट मानले जात आहे. तसेच, आरसीबीच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आली आहे.
रजत पाटीदारने या हंगामात १२ सामने खेळले असून, ११ डावांमध्ये १९२.५७ च्या स्ट्राइक रेटने ३३७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या ६३ आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी यंदाचा हंगाम शानदार राहिला आहे. आरसीबी या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सध्या १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. संघाचा लीग स्टेज फेरीतील फक्त एक सामना शिल्लक आहे. या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यास संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. फक्त आरसीबीकडेच २० गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे आजचा सामना आरसीबीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आरसीबी गुणतालिकेत आपले अव्वल स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरेल. तर, दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद देखील मजबूत फॉर्ममध्ये असल्याने सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?






