
photo- social media
अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका १३ जून रोजी सुरू होत आहे आणि त्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. मालिका सुरू होण्याच्या सुमारे नऊ दिवस आधी कोहली संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी रजत पाटीदार आणि तिलक वर्मा या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. कोहलीच्या अनुपस्थितीमुळे, संघाचा उपकर्णधार असलेला श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर त्याची जागा घेईल हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर केएल राहुल फलंदाजी करेल. याचा अर्थ संघाला मधल्या फळीतील खालच्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज भासेल. RCB चा कर्णधार म्हणून पाटीदारने संघाला यश मिळवून दिलेच, शिवाय मधल्या फळीत जबाबदारीने खेळ करत अनेक महत्त्वाच्या खेळी साकारल्या. भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्याकडे अनुभवी आणि आत्मविश्वासू पर्याय म्हणून पाहत असल्याचे समजते. तिलक वर्माने जरी IPL 2026 मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसेल, तरी डावखुरा फलंदाज म्हणून त्याच्याकडे मधल्या फळीत वेगळी क्षमता आहे. त्यामुळे निवड समिती त्याच्यावरही विश्वास दाखवू शकते.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाचा अंतिम ११ खेळाडूंचा फलंदाजी क्रम जवळपास निश्चित होता. शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करणार होते, त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येणार होता. विराट कोहलीच्या उपस्थितीत, इशान किशन अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र, आता विराट संघातून बाहेर असल्याने, इशान किशन अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिलण्याची शक्यता आहे.
कोहलीच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचाही विचार केला जाऊ शकतो, पण हे दोन्ही फलंदाज एकदिवसीय सामन्यांमध्ये खालच्या फळीत फलंदाजीला आलेले नाहीत. त्यामुळे, रजत पाटीदार आणि टिळक यांचा जास्त विचार केला जात आहे.
विराट कोहलीने IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. रॉय चॅलेंजर्स बंगळुरुला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देण्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरली. निर्णायक सामन्यांमध्ये त्याने सातत्यपूर्ण धावा करत संघाला मजबुती दिली. मात्र या दरम्यान सततच्या व्यस्त वेळापत्रकाचा त्याच्या फिटनेसवर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाले.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बराड, हर्ष दुबे.