लिओनेल मेस्सीने आपला पहिला विश्वचषक २००६ साली खेळला. त्यानंतर २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ अशा सलग पाच स्पर्धांमध्ये त्याने अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले. आता FIFA World Cup 2026 मध्ये खेळल्यास तो सहा विश्वचषक खेळणारा इतिहासातील पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरेल. विशेष म्हणजे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि मेक्सिकोचा गुइलेर्मो ओचोआ (Guillermo Ochoa) यांनाही हा विक्रम करण्याची संधी आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोझे (Miroslav Klose) याच्या नावावर सर्वाधिक १६ गोलांचा विक्रम आहे. मेस्सीने आतापर्यंत २६ सामन्यांत १३ गोल केले आहेत. त्यामुळे आगामी स्पर्धेत त्याने आणखी चार गोल केल्यास तो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनेल. सध्या या यादीत ब्राझीलचा रोनाल्डो (Ronaldo) (१५ गोल) आणि जर्मनीचा गेर्ड मुलर Gerd Müller (१४ गोल) यांचाही समावेश आहे. दरम्यान, फ्रान्सचा स्टार किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappé) देखील या विक्रमाच्या शर्यतीत असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.
मेस्सीने आतापर्यंत चार वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल केले आहेत. २०२६ च्या स्पर्धेत त्याने एक जरी गोल केला, तरी तो (Cristiano Ronaldo) ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर नंतर पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील दुसरा खेळाडू ठरेल. तसेच हा पराक्रम करणारा तो दक्षिण अमेरिकेतील पहिला फुटबॉलपटू बनेल.
विश्वचषक इतिहासात मेस्सीने आपल्या सहकाऱ्यांना ८ वेळा गोलसाठी असिस्ट केले आहे. या बाबतीत तो अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना Diego Maradona याच्या बरोबरीवर आहे. आगामी स्पर्धेत एक असिस्ट करताच तो अर्जेंटिनासाठी सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू बनेल. तसेच पश्चिम जर्मनीच्या फ्रिट्झ वॉल्टर (Fritz Walter) याच्या नावावर असलेल्या ९ असिस्टच्या विश्वविक्रमापासून मेस्सी फक्त दोन पावले दूर आहे.
अर्जेंटिनाचा प्रशिक्षक लिओनेल स्कालोनीने (Lionel Scaloni) याने पुन्हा एकदा मेस्सीवर विश्वास व्यक्त केला आहे. गतविजेता अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मेस्सीच्या अनुभवामुळे संघ अधिक मजबूत मानला जात आहे. जर अर्जेंटिनाने पुन्हा विश्वविजेतेपद पटकावले, तर मेस्सी कर्णधार म्हणून दोन फिफा विश्वचषक जिंकणारा इतिहासातील पहिला फुटबॉलपटू बनेल. अर्जेंटिनाने मेस्सीच्या कर्णधारपदाखाली २०१४ आणि २०२२ चे अंतिम सामने खेळले आहेत, त्यामुळे यावेळी अंतिम सामन्यात पोहोचल्यास हा महान कर्णधारपदाचा विक्रमही निश्चित होईल.






