फोटो सौजन्य : Cognizant Major League Cricket
टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध एम आय न्यूयॉर्क यांच्यामध्ये आज सामना पार पडला. या सामन्यात टेक्सास सुपर किंग्स या संघाचे कर्णधार पद हे 40 वर्षीय फाफ डुप्लेसी याच्याकडे होते. तर एम आय न्यूयॉर्क याचे नेतृत्व निकलस पुरण हा करत होता. या सामन्यांमध्ये फाफ डुप्लेसीच्या संघाने एम आय न्यूयॉर्क ला तीन धावांनी पराभूत केले आहे. हा सामना फारच मिळून जग ठरला या या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध एम आय न्यूयॉर्क यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये सुपर किंग्सचा कर्णधार डुप्लेसी याने कमालीचा कॅच घेतला आणि काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आहे. फाफ डू प्लेसिसने एक असा झेल घेतला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. ४० वर्षीय अनुभवी खेळाडूने मिड-ऑफवर एका हाताने शानदार झेल घेऊन मायकेल ब्रेसवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलेच नाही तर सामन्याचा मार्गही बदलला. हा क्षण क्रिकेटप्रेमींना दीर्घकाळ लक्षात राहील.
टेक्सास सुपर किंग्ज सहज जिंकेल असे वाटत असतानाच, मायकेल ब्रेसवेल आणि मोनांक पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी उत्तम भागीदारी केली. या जोडीने आक्रमक फलंदाजी केली आणि १३ व्या षटकात धावसंख्या ११९/३ पर्यंत नेली, ज्यामुळे एमआय न्यू यॉर्कच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
WHAT A CATCH BY FAF DU PLESSIS ‼️
This belongs at the top of @SportsCenter‘s Top 10. 🔥 pic.twitter.com/3iKYrVLgLS
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 14, 2025