Babar Azam: What will you do if Babar proposes?; It cost her dearly to answer 'that', the actress became a troll; fans said..
Babar Azam : क्रिकेट विश्वात पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि त्याचे खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येत असतात. पण आता मात्र पाकिस्तानी क्रिकेटरमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. तसेच तिने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराने ती सोशल मीडियावर युजर्सकडून चांगलीच ट्रोल झाली आहे. अभिनेत्री नाझीश जहांगीरचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकतीच जहांगीरची एक प्रतिक्रिया इंस्टाग्रामवर समोर आली आहे. ज्यामध्ये तिला विचारण्यात आले आहे की, बाबर आझमने तुला प्रपोज केले होते का? जर असे झाले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? या प्रश्नाला जहांगीरने उत्तर देत म्हटले की, “मी त्याची ऑफर नाकारेन.” तिचे हे उत्तर पाकिस्तानी संघाच्या स्टार फलंदाजाच्या चाहत्यांना बिलकुल रुचले नाही. त्यामुळे चाहत्यांकडून अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आले आहे.
हेही वाचा : Virat kohli : किंग कोहलीच्या नकळत अनुष्का शर्माने नितीश रेड्डीचे केले ‘हे’ काम; खेळाडूने केला मोठा खुलासा…
यूजर्सकडून ट्रोल झाल्याने निराश झालेली नाझीश जहांगीर म्हणाली की, “हे खूप दुर्दैवी आहे की ते केवळ मलाच नाही तर बाबर आझमला देखील बदनाम करत आहेत. ट्रोल कमेंट्सचा नाझीशवर इतका मारा झाला की तिला तिचे खाते ‘खाजगी’ करावे लागले आहे.
दरम्यान, जहांगीरचा एक स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती तिच्या टीकाकारांसाठी अतिशय असभ्य भाषा वापरत असल्याचे दिसत आहे. तसेच तिने बनावट फोटो आणि ऑनलाइन छळवणुकीविरोधात देखील आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसते.
जहांगीरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जहांगीरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्याशिवाय सिकंदर खान नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून त्याला 22 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात येईल.
हेही वाचा : Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…
जहांगीरने लोकांना नकारात्मकता पसरवू नका असे आवाहन करताना म्हटले आहे कीम, “माझा क्रिकेटपटूंशी काहीही एक संबंध नाही. यातील सत्य हे आहे की मी या सर्वांना माझे भाऊ मानते.’ तसेच मनोरंजन क्षेत्रात ती कोणाशीही लग्न करणार नसल्याचे म्हटले आहे. ती परदेशी व्यक्तीशी लग्न करून तिथेच स्थायिक होणार असल्याचेही तिच्याकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या ५ सामान्यांची T२० मालिका सुरु आहे. या मालिकेचे आतापर्यत ३ सामने झाले आहेत. सुरुवातीचे दोन्ही सामने न्यूझीलंडच्या संघाने जिंकले असून मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता मालिका नावावर करण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला फक्त विजयाची गरज होती. आज मालिकेचा तिसरा सामना खेळवण्यात आला, या सामन्याचे आयोजन ईडन पार्क येथे करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने कमाल करून न्यूझीलंडच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे.