Virat kohli : किंग कोहलीच्या नकळत अनुष्का शर्माने नितीश रेड्डीचे केले 'हे' काम; खेळाडूने केला मोठा खुलासा... (फोटो-सोशल मीडिया)
Virat kohli : आयपीएल 2025 22 मार्चपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन येथे पहिला सामना खेळावला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर सराव करत आहे. तर त्याची जोडीदार अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आलिया आहे. तीने विराट कोहलीच्या नकळत पाच वर्षांपूर्वी क्रिकेटपटू नितीश रेड्डी याची मदत केली होती. याबाबत खुद्द नितीश रेड्डीने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.
विराट कोहली हे क्रिकेट जगतातील एक मोठे नाव आहे. केवळ भारतीयच नाही तर परदेशी खेळाडूंना देखील कोहलीसोबत फोटो काढायचा असतो. काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील विराट कोहली सोबतच्या एका फोटोसाठी हतबल झाला होता. तेव्हा अनुष्का शर्माने त्याला मदत केली होती. ज्याबद्दल नितीश रेड्डीने आता सांगितले आहे.
हेही वाचा : IPL 2025 च्या आधी रिकी पॉन्टिंगने केली पूजा, पाकिस्तानी चाहते संतापले, रागाने म्हणाले- ‘पण असं का?’
प्यूमा इंडियासोबतच्या पॉडकास्टमध्ये नितीश रेड्डीने पाच वर्षांपूर्वीची घटना सांगितली आहे. नितीश रेड्डी म्हणाला की, नमन पुरस्कारादरम्यान त्यांनी विराट कोहलीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो काही यशस्वी झाला नाही तेव्हा अनुष्काने गुपचूप एक फोटो क्लिक केला ज्यामध्ये विराट कोहलीही त्याच्यासोबत दिसत होता.
नितीश रेड्डीने पुढे सांगितले की, किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने कोहलीसोबत फोटो काढण्यासाठी कशाप्रकारे मदत केली. नितीशने सांगितले की, अनुष्का मॅडमने पाहिले की मी फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा त्यांनी माझी ती इच्छा पूर्ण केली होती.
नितीश रेड्डीने सांगितले की, “नमन अंडर-16 अवॉर्ड्स दरम्यान, मी 16 वर्षांचा होतो आणि मला विराट भाईसोबत एक फोटो काढायचा होता. तो माझ्या मागे बसला होता, तेव्हा मी फोटो काढण्यापासून स्वत:ला थांबवू शकलो नाही. त्यावेळी माझ्याकडे माझा मोबाइल नव्हता, तर मी माझ्या काकांचा फोन घेतला आणि गुपचूप सेल्फी काढला.”
नितीश रेड्डी पुढे म्हणाला की, “नंतर मला विराटसोबत आणखी एक फोटो काढायचा होता, परंतु, तिथल्या बॉडीगार्ड्समुळे ते जवळजवळ अशक्य असे होते. यादरम्यान अनुष्का मॅडमने मी फोटो काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले यानी त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की, मी तुझा फोटो काढते.’ नितीश म्हणाला की ‘हे त्याच्यासाठी अपेक्षेपेक्षा खूप होते.’






