कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत होणार आहे. क्वालिफायर 1 चा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. आजचा हा संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. आजचा सामन्यांमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ आयपीएल 2024 ची अंतिम फेरी खेळेल. आजच्या सामन्यांमध्ये ज्या संघाचा पराभव होईल तो संघ एलिमिनेटर सामन्यांमध्ये विजयी झालेल्या संघाशी लढणार आहे.
[read_also content=”प्लेऑफमधील पहिला सामना RCB vs RR पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला मिळणार क्वालिफायरची संधी https://www.navarashtra.com/sports/if-rcb-vs-rr-match-eliminator-clash-is-canceled-due-to-rain-who-will-get-the-qualifier-match-what-are-the-rules-of-ipl-read-in-details-nryb-535859.html”]
जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेऑफची आकडेवारी
कोलकाता नाईट राइडर्सचा संघ आयपीएलमध्ये आठव्यांदा प्लेऑफमध्ये खेळणार आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदा आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये सातव्यांदा खेळणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) प्लेऑफमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. प्लेऑफ फेरीत, कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) 13 सामन्यांपैकी 8 जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. सनरायझर्स हैदराबादने (SRH) प्लेऑफमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. प्लेऑफ फेरीत, सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 11 सामन्यांपैकी 5 जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सचे पारडे जड दिसत आहे.
एलिमिनेटर सामन्याची आकडेवारी
दोन्ही संघाच्या एलिमिनेटर सामन्याबद्दल विचार केला तर यामध्ये आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत प्लेऑफ फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 2 एलिमिनेटर सामने खेळले गेले आहेत. यातील एक सामना सनरायझर्स हैदराबादने तर एक सामना कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला. त्यामुळे कोणता संघाचे वजन जास्त आहे ते सांगणं कठीण आहे. परंतु सन 2018 मध्ये, सनरायझर्स हैदराबादने क्वालिफायर-2 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. एकंदरीत, सनरायझर्स हैदराबादचा प्लेऑफ फेरीत कोलकाता नाईट रायडर्सवर वरचष्मा असल्याचे दिसते.