फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बीसीसीआय सचिव : भारतीय नियामक मंडळाचे (BCCI) चे सचिव जय शाह यांची आता आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवडणून आले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयमध्ये त्याचे पद सध्या रिक्त आहे. २९ सप्टेंबर रोजी रविवारी बंगळुरूमध्ये बीसीसीआयची बैठक पार पडली. यामध्ये ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या सदस्यांनी विद्यमान सचिव जय शाह यांना संक्रमण शक्य तितके सुरळीत करण्यासाठी आपला उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या सचिवपदी म्हणजेच जय शाह यांची जागा घेणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाह आपल्या पदावरून पायउतार होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे कारण जय शाह हे १ डिसेंबरपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपद सांभाळणार आहेत. नवीन सचिवाची निवड एजीएमच्या अजेंड्यावर नव्हती. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी उपस्थित सदस्यांनी आपापसात उत्तराधिकार योजनेवर चर्चा केल्याचे कळते.
एजीएममध्ये सहभागी झालेल्या राज्य संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले की, ‘सर्व योग्य प्रक्रिया शक्य तितक्या लवकर अंमलात आणण्याची सामान्य विनंती होती कारण यामुळे आम्हाला स्पष्टता मिळेल. याशिवाय, आमच्याकडे आयपीएल लिलावासारखे काही मोठे कार्यक्रमही येत आहेत. या परिस्थितीत, असे होऊ नये की सर्वकाही एकाच वेळी हाताळले पाहिजे.
बीसीसीआयच्या दृष्टिकोनाने पाहायचं झालं तर, सध्याच्या परिस्थितीत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार, सहसचिव देवजित सैकिया आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे शाह यांचे उत्तराधिकारी बनण्याच्या शर्यतीत आहेत. अरुणसिंग धुमाळ आणि अविशेक दालमिया यांची आयपीएल गव्हर्निंग कमिटी (GC) साठी जनरल बॉडी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. धुमल हे किमान आयपीएल २०२५ पर्यंत लीगचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील.