Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात का झाला वाद? हे मोठे कारण आले समोर 

विराट कोहलीसोबतच्या या संभाषणाबद्दल विनोद राय यांनी अनिल कुंबळे यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकातही याबाबत उल्लेख केला आहे. विनोद राय यांनी लिहिले की, 'कुंबळेसोबत माझी दीर्घ चर्चा झाली. हे प्रकरण ज्या पद्धतीने समोर आणले गेले त्यामुळे कुंबळे चांगलाच नाराज झाला. कुंबळेला वाईट वाटले.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 08, 2022 | 12:49 PM
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात का झाला वाद? हे मोठे कारण आले समोर 
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : BCCI मधील प्रशासक समितीचे (COA) माजी अध्यक्ष विनोद राय यांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्यातील वादाबद्दल मोठा खुलासा केला आहे. २०१७ मध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात वाद झाला होता. या घटनेनंतर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा जाहीर राजीनामा दिला. आता सीओएचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.

कोहली आणि कुंबळे यांच्यात का झाला वाद?

विनोद राय यांनी त्यांच्या ‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात अनिल कुंबळे शिस्तीच्या बाबतीत खूप कडक असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या काटेकोरपणामुळे संघातील सदस्य त्याच्यावर फारसे खूश नव्हते. याबाबत मी विराट कोहलीशी बोललो तेव्हा त्यानेही हे सांगितले. विराट कोहली म्हणाला होता की, अनिल कुंबळेच्या कामाच्या पद्धतीमुळे टीमचे तरुण सदस्य खूप घाबरायचे.

विनोद राय यांनी मोठा खुलासा केला आहे

विराट कोहलीसोबतच्या या संभाषणाबद्दल विनोद राय यांनी अनिल कुंबळे यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकातही याबाबत उल्लेख केला आहे. विनोद राय यांनी लिहिले की, ‘कुंबळेसोबत माझी दीर्घ चर्चा झाली. हे प्रकरण ज्या पद्धतीने समोर आणले गेले त्यामुळे कुंबळे चांगलाच नाराज झाला. कुंबळेला वाईट वाटले. संघात शिस्त आणि व्यावसायिकता आणणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी आहे, असे कुंबळेला वाटले आणि वरिष्ठ असल्याने खेळाडूंनी त्यांच्या विचारांचा आदर करायला हवा होता.

कुंबळेने गोष्टी स्वतःकडे ठेवल्या

राय म्हणाला, ‘कुंबळेनेही गोष्टी स्वत:कडेच ठेवल्या आणि कोणत्याही मुद्द्यावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा हा सर्वात परिपक्व आणि आदरपूर्ण मार्ग होता जो सहभागी सर्व पक्षांसाठी अप्रिय असू शकतो. २०१७ मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल कुंबळेसोबत माजी कर्णधार विराट कोहली अजिबात तयार होत नव्हता.

Web Title: Why was there a dispute between virat kohli and anil kumble this is the big reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 12:49 PM

Topics:  

  • Anil Kumble
  • bcci
  • cricket
  • Sport News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
2

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर
4

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.