, मॅथ्यू फोर्ड(फोटो-सोशल मीडिया)
WI vs IRE : आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना खेळवण्यात आला. या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज मॅथ्यू फोर्डने एक भीम पराक्रम केला आहे. मॅथ्यू फोर्डने सर्वात जलद अर्धशतकाच्या एबी डिव्हिलियर्सच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. फोर्डने अवघ्या १६ चेंडूंचा सामना करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक इतिहास आपल्या नावे केला. तो सर्वात जलद अर्धशतक झळकवणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे.
२३ वर्षीय क्रिकेटपटू फोर्ड ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात आला. त्याने फक्त १६ चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठला. याआधी १८ जानेवारी २०१५ रोजी जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एबी डिव्हिलियर्सने १६ चेंडूत अर्धशतक झळकावून विश्वविक्रम केला होता. त्या सामन्यात एबीडीने फक्त ४४ चेंडूत १४९ धावा चोपल्या होत्या.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने आयर्लंडविरुद्ध ८ विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान, फोर्डने अखेर १९ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २ चौकार आणि ८ षटकार लगावले. फोर्ड याने यावेळी जस्टिन ग्रीव्हज (३६ चेंडूत ४४) सोबत सातव्या विकेटसाठी २५ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली.
फोर्डच्या आधी, वेस्ट इंडिजकडून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा होता. २ मार्च २०१९ रोजी ग्रोस आयलेट येथे इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने वेस्ट इंडिजसाठी फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
हेही वाचा : IND Vs ENG : भारतीय कसोटी संघाचा प्रश्न मिटला! कोहलीच्या जागी ‘हा’ खेळाडू पुढे, क्रमांक-४ वर करेल फलंदाजी..
MATHEW FORDE EQUALLED AB DE VILLIERS’ FASTEST ODI FIFTY RECORD.
– A half century in 16 balls. 🤯pic.twitter.com/sxD2EpLX9P
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2025
शुक्रवारी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजसाठी फोर्ड व्यतिरिक्त, केसी कार्टीनेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. सेंट मार्टिन या २८ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजील येऊन करताना १०९ चेंडूत १०२ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.