स्कॉटलंडचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दूसरा सामना स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात स्कॉटलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करणार आहे.
हेही वाचा : IND vs USA : सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट आणि मोफत स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर तपशील
स्कॉटलंड संघाचा कर्णधार रिची बेरिंग्टनने टॉस जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. संपूर्ण संघात खूप सकारात्मक भावना आहे. बंगळूरला आल्यापासून आम्हाला तयारीसाठी एक शानदार आठवडा मिळाला आहे. गेल्या विश्वचषकात आम्ही काही खूप चांगली कामगिरी केली होती. आमच्या संघात काही युवा खेळाडूही आले आहेत. होबार्टमधील त्या दिवसाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत.”
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाय होपच्या बाजून टॉसचा कौल जाऊ शकला नाही. टॉस झाल्यानंतर होप म्हणाला की, दिवसांपासून नाणेफेक जिंकलेली नाही. कदाचित आम्हीही प्रथम गोलंदाजीच केली असती. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही मैदानात उतरतो, तेव्हा आम्ही जिंकूच असा विचार केला पाहिजे. थोडा उशीर झाला, पण तो संघात आला आहे आणि खेळायला उत्सुक आहे. जेव्हा तुम्ही या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा ती नेहमीच एक उत्तम भावना असते.
हेही वाचा : PAK vs NED : नेदरलॅंडची एक चूक अन् सामना गमावला! पाकिस्तानने 3 विकेट्सने मिळवला विजय…
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), ब्रँडन मॅकमुलन, मायकेल जोन्स, टॉम ब्रुस, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, मार्क वॉट, ब्रॅड करी, सफ्यान शरीफ
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शमार जोसेफ
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये नेदरलॅंडच्या संघाने कमालीची कामगिरीचे प्रदर्शन केले खरे पण त्यांना विजय मिळवळता आला नाही. पाकिस्तानने नेदरलॅंड संघाचा ३ विकेट्सने पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली.






