• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Youths Have Expressed Anger Over Bogus Voting In Junnar Taluka

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज पट्ट्यात मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. दुर्गम डोंगरदऱ्यांपासून ते ग्रामीण व शहरी भागापर्यंत सर्वत्र मतदारांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 04:26 PM
जुन्नर तालुक्यात 'बोगस' मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बोगस मतदानाचे गालबोट; नवयुवक मतदारांचा संताप
  • जुन्नर तालुक्यात तणावाचे वातावरण
  • मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
ओतूर/मनोहर हिंगणे : ​ महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आज जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज पट्ट्यात मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. दुर्गम डोंगरदऱ्यांपासून ते ग्रामीण व शहरी भागापर्यंत सर्वत्र मतदारांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र, एकीकडे मतदानाचा उत्साह असताना दुसरीकडे प्रशासकीय सावळागोंधळ आणि बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.

जुन्नर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. येथील वयोवृद्ध मतदारांनी दाखवलेली निष्ठा वाखाणण्याजोगी होती. अनेक केंद्रांवर ८० ते ९० वयोगटातील वृद्ध नागरिक आपल्या नातवंडांच्या हाताला धरून किंवा लाकडी काठीचा आधार घेत मतदानासाठी पोहोचले होते. ​”वयाची नव्वदी गाठली तरी मतदान करायला कधी चुकलो नाही. विकास करणारा माणूस निवडण्याचा हाच तो दिवस,” अशी भावना ओतूर येथील चैतन्य विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्यध्यापक मुरलीधर गहिनाजी भोर गुरुजी (वय वर्षे ९७ ) या ज्येष्ठ मतदाराने व्यक्त केली. शारीरिक व्याधी असूनही केवळ लोकशाहीवरील श्रद्धेपोटी या ज्येष्ठांनी केंद्रावर केलेली गर्दी ही नवमतदारांसाठी एक मोठा धडा ठरली.
​
व्यापारी आणि शेतीसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या ओतूर शहरात आणि परिसरातील गावांमध्ये सकाळच्या पहिल्या चार तासांत विक्रमी मतदानाची नोंद झाली. सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. १० वाजेपर्यंत बहुतांश केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः महिला मतदारांचा सहभाग यावेळी लक्षणीय होता. महिलांनी आपले घरकाम लवकर उरकून लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवला.

​ज्यावेळी मतदार मोठ्या उत्साहाने केंद्रावर पोहोचत होते, त्याचवेळी अनेक ठिकाणी मतदार यादीतील त्रुटींनी गोंधळ उडवून दिला. अणे-माळशेज पट्ट्यातील काही गावांमधील जुन्या जाणत्या मतदारांची नावे अचानक यादीतून गायब झाल्याचे समोर आले. “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याच केंद्रावर मतदान करतो, पण आज नाव शोधताना कर्माची फळं भोगावी लागत आहेत,” असा संतप्त सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला. अनेक मतदारांनी आधार कार्ड आणि ओळखपत्र आणले असूनही, यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानाविना माघारी फिरावे लागले. यामुळे प्रशासनावर आणि विशेषतः निवडणूक विभागाच्या नियोजनावर मतदारांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले.

बोगस मतदानाचे गालबोट; नवयुवक मतदारांचा संताप

​या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ‘बोगस मतदानाची’. काही संवेदनशील केंद्रांवर धक्कादायक प्रकार समोर आले. अनेक नवयुवक मतदार, जे पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी उत्सुक होते, जेव्हा केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना मतदान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ​हा प्रकार उघडकीस येताच केंद्राबाहेर मोठा गोंधळ झाला. “आम्ही लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो होतो, मात्र आमच्या हक्काचे मत कुणीतरी आधीच देऊन गेले, हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी संतापजनक प्रतिक्रिया एका युवती मतदाराने दिली. काही गावांमध्ये यामुळे दोन गटांत शाब्दिक चकमकीही उडाल्या, ज्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याचे दिसून आले. या मतदारांना अनेक ठिकाणी मतदान यादीत नावाची पाहणी करण्यासाठी भटकावे लागले. शेवटी अनेक मतदारांना नाव नेमके कोणते मतदान केंद्रावर आहे याचा ठाव ठिकाणा लागू शकला नाही. मतदान कार्डवरील क्रमांकाच्या आधारे यादीत नाव शोधले तरी ते सापडले नाही. इतर दुसऱ्या मतदान केंद्रावर देखील पडताळणी केल्यानंतरही नाव सापडले नसल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. गेल्या पंधरा दिवसात जुन्नर तालुक्यातील गावा गावांमधील वातावरण आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या राजकारणाने तापले होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये अल्पशा असा प्रतिसाद दिसून आला.

हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

​एकूणच जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज पट्ट्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेले हे मतदान संमिश्र अनुभवांचे राहिले. वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावून एक सकारात्मक संदेश दिला असला, तरी बोगस मतदान आणि यादीतील घोळामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या गोंधळाचा आणि उत्साहाचा निकाल पेटीतून कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार याविषयी एक हजार ते पाच हजार रुपयांच्या पैंजा लागलेल्या आहेत. मतदान केंद्रावर कोणत्या ठिकाणी कशी मते पडणार याबाबत अफवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षांपासून चाललेल्या राजकारणाची पातळी घसरली आहे. कोणता पक्ष सत्तेत आणि कोणता पक्ष विरोधात हे कळेनासे झाले आहे. एकमेकांच्या विरोधात उभे राहून प्रचार करायचा आणि स्वार्थासाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायच हे मतदारांना संभ्रमात टाकण्यासारखा आहे. कुणालाही मतदान दिले तर पुन्हा एकत्र येणार आणि आमच्या मतदानाची किंमत शून्य ठरविणार त्यामुळे आम्हाला आता मतदान करण्याचा उत्साह राहिला नाही. – भास्कर शंकर मुंढे (जेष्ठ मतदार, ओतूर)

Web Title: Youths have expressed anger over bogus voting in junnar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Bogus Voting
  • Election News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद
1

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य
2

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
3

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
4

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात 

IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात 

Feb 07, 2026 | 06:08 PM
“हिंदू केवळ नाम नसून…”; ‘मुंबई व्याख्यानमाले’तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत

“हिंदू केवळ नाम नसून…”; ‘मुंबई व्याख्यानमाले’तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत

Feb 07, 2026 | 06:07 PM
US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट

Feb 07, 2026 | 05:56 PM
”तरूण पिढीला इंटरेस्ट नाही..”, शाहरुख, आमिर, सलमानबाबत इमरान खान स्पष्टच बोलला, कारण देत म्हणाला…

”तरूण पिढीला इंटरेस्ट नाही..”, शाहरुख, आमिर, सलमानबाबत इमरान खान स्पष्टच बोलला, कारण देत म्हणाला…

Feb 07, 2026 | 05:56 PM
महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

Feb 07, 2026 | 05:43 PM
पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

Feb 07, 2026 | 05:33 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

Feb 07, 2026 | 05:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.