
बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची आगेकूच
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात साखळी फेरीत ब गटात ईशान लागू, निखिल चितळे, तन्मय चोभे, नेहा लागू, बाळ कुलकर्णी, परिक्षित देवल, कर्णा मेहता, यश मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, तनिश बेलगलकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्स संघाने हॉक्स संघाचा ५-२ असा पराभव करून तिसरा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत फाल्कन ऑप्टिमा संघाने जोग कॉमेट्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, सुमित नेरकर, वरुण निवर्गी, नीरज दांडेकर, अन्वित राजवाडे, वरद चितळे, प्रीती फडके यांनी सुरेख कामगिरी केली.
Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
अ गटात वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाने सेइनुमेरो रॉकेट्स संघाचा ४-३ असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाकडून सुधांशू मेडसीकर, श्रेयस भामरे, मकरंद चितळे, अनिल देडगे, देवेंद्र चितळे, राजेश पारेख, देवेन शेवाळे, हिमांशु थोरात यांनी अफलातून खेळी केली. अन्य लढतीत नाडगोंडे रेव्हन्स संघाने एरियल स्विफ्ट्स संघाचा ५-२ असा पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली.
वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीतील लढतींमध्ये बेल्फिन्स टायगर्स आणि नाडगोंडे रेव्हन्स या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. नाडगोंडे रेव्हन्सने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला, तर बेल्फिन्स टायगर्सने दुसऱ्या विजयाची नोंद केली.
Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
अ गटातील आणखी एका सामन्यात सेइनुमेरो रॉकेट्सने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ५-२ असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सेइनुमेरो रॉकेट्सकडून अनिकेत सहस्त्रबुद्धे, वरूण साहू, दिप्ती सरदेसाई, समीर जालान, नीलाश केळकर, हेमंत पाळंदे, क्षितिज कोतवाल, वेदांत खटोड, संस्कृती जोशी आणि सोहम जोशी यांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.