भारत विरुद्ध हाँगकाँग (फोटो- सोशल मिडिया)
30 ऑगस्ट रोजी भारत आणि थायलंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय प्राप्त केला. त्यानंतर भारतीय संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात शेफाली वर्माने 64 रन्सची खेळी केली होती. नंतर फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने थायलंडला अवघ्या ६५ धावांत गुंडाळले.
आज भारताचा संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध भिडणार आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने उत्तम सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी थोडी गडबडली होती आणि संघाने अवघ्या २९ रन्समध्ये ७ फलंदाज गमावले होते. त्यामुळे आज भारतीय महिला संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
सामना – भारत महिला विरुद्ध हाँगकाँग चायना महिला
वार – गुरुवंत
तारीख – 3 सप्टेंबर
ठिकाण – दुबई
वेळ – भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता
| स्थान | संघ | सामने (P) | विजय (W) | पराभव (L) | गुण (Pts) | नेट रनरेट (NRR) |
| १ | भारत (IND-W) | १ | १ | ० | २ | +४.७०० |
| २ | पाकिस्तान (PAK-W) | १ | १ | ० | २ | +१.७५० |
| ३ | थायलंड (THA-W) | ३ | १ | २ | २ | -२.०५० |
| ४ | हाँगकाँग चायना (HK-W) | १ | ० |
फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी पहिल्या सामन्यात थायलंडच्या फलंदाजांना ६५ धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. थायलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर शेफाली वर्माने ६४ धावांची वेगवान खेळी केली होती. या सामन्यातही तिच्याकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे.






