Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष

World Athletics Championship 2025 मध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आज आमनेसामने भिडणार असून आता नीरजकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2025 | 12:31 PM
नीरज आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर, कोण मारणार बाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

नीरज आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर, कोण मारणार बाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम हे २०२५ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील 
  • पात्रता फेरीत नीरज चोप्राने ८४.५० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले 
  • अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:५३ वाजता सुरू होईल आणि स्टार स्पोर्ट्सवर थेट दाखवला जाईल

भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या १७ व्या आवृत्तीत स्पर्धा करत असताना, २०२५ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे भालाफेकपटू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून दोन वेळा ऑलिंपिक विजेता असलेला नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा पॅरिस ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम आहेत. सर्वांच्या नजरा आता या स्पर्धेवर लागून राहिल्या आहेत. 

गेल्या बुधवारी (१७ सप्टेंबर २०२५) नीरज आणि अर्शद यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत, गट अ मध्ये, भारतीय स्टारने ८४.५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. नीरज आणि अर्शद नदीम दोघेही या खेळात माहीर असून आता या दोघांकडे लक्ष लागून राहिले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव पाहता या सामान्यात नीरजने जिंकावे अशीच त्याच्या चाहत्यांची आणि देशाची अपेक्षा आहे. 

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास..

कधी आणि कुठे पाहता येणार?

रोमांचक अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:५३ वाजता सुरू होईल. चाहते स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स २ वर घरी थेट खेळाचा आनंद घेऊ शकतात. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेले खेळाडू हे नीरज चोप्रा, अँडरसन पीटर्स, कर्टिस थॉम्पसन, ज्युलियन वेबर, जाकुब वॅडलेच, ज्युलियस येगो, केशॉर्न वॉलकॉट, डेव्हिड वॅग्नर, सचिन यादव, अर्शद नदीम, कॅमेरॉन मॅकएन्टायर आणि रुमेश थरंगा पाथिराज आहेत. दरम्यान सचिन यादवनेही आपली छाप पाडली आहे. केवळ नीरज चोप्राच नाही तर सचिन यादवनेही भारताकडून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. २६ वर्षीय खेळाडूने ८३.६७ मीटर फेकसह १० वे स्थान पटकावले.

अनेक दिग्गज खेळाडू अंतिम फेरीत 

नीरज चोप्रा व्यतिरिक्त, अंतिम फेरीत ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम, डायमंड लीग विजेता ज्युलियन वेबर, माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स, ज्युलियस येगो, डेव्हिड वेंगनर, कर्टिस थॉम्पसन, कॅमेरॉन मैत्री, रुमेश थरंगा, जाकुब वॅडलेजच, केशॉर्न वॉलकॉट आणि सचिन यादव यांचा समावेश आहे. या १२ खेळाडूंपैकी सात खेळाडूंनी ९० मीटरपेक्षा जास्त फेक केली आहे. अँडरसन पीटर्सचा पात्रता फेरीतील सर्वोत्तम फेक ८९.५३ मीटर होता. या खेळाडूंमध्ये पीटर्सचा कारकिर्दीतील सर्वोत्तम फेक देखील आहे. त्याने २०२२ मध्ये ९३.०७ मीटर फेकले.

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

वेबरचा फॉर्म सर्वात धोकादायक

सध्याच्या फॉर्मच्या बाबतीत, जर्मनीचा ज्युलियन वेबर अव्वल फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या महिन्यात झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये ९१.५१ मीटर फेकले. त्याने दोनदा ९० मीटर ओलांडले आहेत. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. तथापि, तो तरीही दुसऱ्या क्रमांकावर राहिला. वेबरनेही शर्यत जिंकली.

Web Title: World athletics championship 2025 india vs pakistan neeraj chopra and arshand nadeem javelin throw final when and where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Neeraj Chopra
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs PAK: पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद? रविवारी दुबईत रंगणार युद्ध
1

IND vs PAK: पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद? रविवारी दुबईत रंगणार युद्ध

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी
2

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत
3

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी
4

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.