नीरज चोप्रा(फोटो-सोशल मीडिया)
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवण्यासाठी किमान अंतर ८४.५० मीटर इतके आहे, जे नीरजने पहिल्याच प्रयत्नात सहज पार करून अनितं फेरीत धडक मारली आहे. यामध्ये खास गोष्ट म्हणजे पहिल्याच फेरीत थेट पात्रता मिळवणारा नीरज हा एकमेव खेळाडू ठरला. तथापि, आतापर्यंत नीरज चोप्रा सोडून फक्त जर्मनीचा ज्युलियन वेबर यालाच चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचता आले आहे.
ज्युलियन वेबरने ८७.२१ मीटर थ्रो फेकून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता, या स्पर्धेत नीरज चोप्राला आपले वर्चस्व राखण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. वेबर व्यतिरिक्त, अंतिम फेरीत त्याचा सामना पाकिस्तानच्या अर्शद नदीमशीही देखील होण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर हे पहिल्याच वेळा नीरज आणि नदीम हे दोन दिग्गज खेळाडू मोठ्या मंचावर एकमेकांसमोर येणार आहे. पॅरिसमध्ये, अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या फेऱ्यासह सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तर नीरज चोप्राने ८९.४५ मीटरच्या फेऱ्यासह रौप्यपदक जिंकले होते.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये नीरज चोप्राला ज्युलियन वेबर, वॉलकॉट, वॅडल्स आणि भारताच्या सचिन यादव सारख्या खेळाडूंसह गट अ मध्ये स्थान दिले गेले आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला गट ब मध्ये आहे, ज्यामध्ये त्रिनिदादचा पीटर्स, केनियाचा येगो, ब्राझीलचा दा सिल्वा आणि भारताचा रोहित यादव आणि यशवीर सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : INDW vs AUSW : स्मृती मानधनाचा आणखी एक भीम पराक्रम! ‘या’ एकदिवसीय विक्रमाने जगाला केले चकित
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ८४.५० मीटर चे अंतर पार करावे लागते. ८४.५० मीटर भाला फेकलेला भालाफेक खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरवला जातो. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये अव्वल ठरलेल्या १२ खेळाडूंचा समावेश करण्यात येत असतो. दोन्ही गटातील जे खेळाडू ८४.५० मीटर भाला फेकतात किंवा अव्वल १२ मध्ये असतात ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरवले जातात.






