नीरज चोप्रा आणि हिमानी मोर(फोटो-सोशल मीडिया)
Himani More retires from tennis : नीरज चोप्राचा सद्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीला राम राम ठोकला आहे. तिच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. हिमानीने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हिमानीची महिला एकेरीत ४२ व्या तर दुहेरीत २७ व्या स्थानावर विराजमान आहे. कमी कालावधीत टेनिसमध्ये चांगली कामगिरी करून देखील तिने या खेळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमानी आणि नीरज यांचा जानेवारी २०२५ मध्ये हिमाचल प्रदेशातील सोलन येथे लग्न सोहळा पार पडला. हा लग्न सोहळा खूप गुप्तपणे करण्यात आला. या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. लग्नानंतर नीरज अमेरिकेला गेला होता, त्यामुळे दोघांचे स्वागत अद्याप करण्यात आले नाही. अशी माहिती समोर आली आहे. लग्नानंतर हिमानी नवीन मार्गाच्या शोधात होती.
हेही वाचा : CPL 2025 : फ्लेचरची स्फोटक खेळी व्यर्थ! मॅकडर्मॉटनेच्या वादळापुढे सर्वच उध्वस्त; गयानाचा धमाकेदार विजय
मिळालेल्या माहितीनुसार, हिमानीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला १.५ कोटी रुपयांची नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु तिने त्या ऑफरला नकार दिला आहे. हिमानीने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे आणि अमेरिकेतील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास देखील केला आहे.
हिमानीने घेतलेल्या निर्णयाचा असा अर्थ लावाल जात आहे कि तिला केवळ खेळाडू म्हणूनच नाही तर व्यवसाय जगात देखील आपले नाव कमवायचे आहे. त्यासाठी तिने क्रीडा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती स्वतः काम करण्याऐवजी इतरांना नोकरी देणार असल्याची शक्यता आहे. नीरज किंवा हिमानीकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
हेही वाचा : जय शाहपासून ते अनिल कुंबळेपर्यंत, क्रिकेटपटूंकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा; वाचा सविस्तर..
पुढे वडील चंद यांनी सांगितले की, नीरजचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. हिमानी नीरजसोबत युरोपमध्ये राहत आहे. नीरज सप्टेंबरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या झुरिच डायमंड लीगच्या तयारीला लागला आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक२०२० मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅरिसमध्ये रौप्यपदकावर त्याने आपले नाव कोरले होते.