
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. इथे खेळल्या गेलेल्या कर्णधार यश धुलने 47 बॉलमध्ये 100 रन्सची आक्रमक आणि तूफान खेळी केली आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे सेंट्रल दिल्ली किंग्सने 14 व्या ओव्हरमध्ये सामना जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 15-15 ओव्हर्सचा खेळवण्यात आला आहे.
सध्या दिल्ली प्रीमियर लीगचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये बुधवारी जुनी दिल्ली विरुद्ध सेंट्रल दिल्लीच्यामध्ये सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना पुरानी दिल्लीने 15 ओव्हर्समध्ये फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 140 रन्स केल्या. समर्थ शेठने 22 बॉलमध्ये 32 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने पाच फोर मारले. शेवटच्या ओव्हर्समध्ये 21 बॉलध्ये 46 रन्स केल्या.
यानंतर सेंट्रल दिल्लीचा संघ मैदानात उतरला. या संघाने आपली पहिली विकेट लवकर गमावली. सिद्धार्थ जून केवळ 8 रन्सवर आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी यश धूलने आपल्या आक्रमक खेळीने विजेचा मार्ग सोपा केला. त्याने केवळ 47 बॉलमध्ये 100 रन्स ठोकल्या. त्याने या खेळीत 9 फोर आणि 6 सिक्स मारले. त्यानंतर तिसऱ्या नंबरवर युगल सैनीने 27 रन्सची खेळी केली. यश धूलने आपल्या एकट्याच्या खेळीच्या जोरावर सेंट्रल दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला.
YASH DHULL HAS 𝐍𝐎 𝐂𝐇𝐈𝐋𝐋 ⚡💯 Catch all the DPL 2026 action LIVE on FanCode 📲#DelhiPremierLeague #DPL2026 pic.twitter.com/HyrDdnFuEV — FanCode (@FanCode) August 5, 2026
या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एकूण 8 संघ खेळत आहेत. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. 31 जुळीपासून स्पर्धा सुरू झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आही. या स्पर्धेचे जास्तीत जास्त सामने ही अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जात आहेत.