फोटो सौजन्य - सोशल मीडिया
योगराज सिंह यांचे वक्तव्य : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा नवा सिझनची सुरुवात झाली आहे, यामध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदलले आहेत. मागील काही महिन्यांपासून भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे वैयत्तिक आयुष्य चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा २० मार्च रोजी अधिकृत घटस्फोट झाला. यापूर्वी एक वृत्त आले होते की चहल आणि धनश्री यांनी सुसंगततेच्या समस्यांमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता एक नवीन अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की ते कुठे राहणार या प्रश्नामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आहे.
भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. याच प्रकारणासंदर्भात आता युवराज सिंह वडील योगराज सिंह यांनी आता एक वक्तव्य केले आहे. यामध्ये युझवेन्द्र चहल आणि धनश्री वर्मायांच्या नात्यावर टिपणी केली आहे. चहल आणि धनश्रीच्या नात्यावर बोलताना योगराज सिंह म्हणाले की, “जर चहलने लग्न करताना ४.७५ कोटींची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्याकडे ८ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असती. मी तुम्हा सर्वांना अविवाहित राहण्याचा आणि काही तरी करण्याचा सल्ला देईन.”
ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांच्या मते, लग्नानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हरियाणामध्ये राहू लागले. लग्नाच्या काही दिवसांनंतर, धनश्रीने मुंबईत स्थलांतर करण्याची इच्छा व्यक्त केली, पण चहल सहमत झाला नाही. चहलची इच्छा होती की त्याची पत्नी त्याच्या पालकांसोबत हरियाणामध्ये राहावी.
विकी लालवानी यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “लग्न झाल्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री हरियाणामध्ये चहलच्या पालकांसोबत राहायला गेले आणि गरज पडल्यासच मुंबईत आले. या मुंबई-हरियाणामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचे लग्न तुटले. खरंतर, युजवेंद्र त्याच्या पालकांसोबत आणि धनश्रीसोबत मुंबईत राहायचे होते.”
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. घटस्फोटापूर्वी युजवेंद्र चहलने धनश्रीला २.३७ कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. तर घटस्फोट झाल्यानंतर २.३८ कोटी रुपये देण्यात आले.