IPL 2025: 'Yorker King' Bumrah's foul and angry outburst, rude behavior with the batsman, Rohit robbed him of his joy.., watch the video
IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजाकडून जसप्रीत बुमराहची चांगली काळजी घेण्यात आली. भारतीय संघाबाहेर असणारा विदर्भाचा फलंदाज करुण नायरने बुमराहचा सामना केला आणि त्याचा चेंडू स्टँडच्या पलीकडे पाठवण्यात यश मिळवले. बुमराहला मात्र रुचले नाही. त्याने करुण नायरसोबत असभ्य वर्तन केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
करुण नायरने तब्बल तीन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. यानंतर त्याने आपल्या शानदार खेळीने सर्वांचे मनं जिंकली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला एक प्रभावी खेळाडू म्हणून फलंदाजीला उतरवले होते. त्यानंतर त्याने आपल्या शानदार फलंदाजीने ४० चेंडूत ८९ धावा केल्या. करुण नायरचे हे अर्धशतक ७ वर्षांनी आले आहे. या काळात त्याने बुमराहवर आपला वरचष्मा राहू दिला. त्याने बुमराहच्या ९ चेंडूत २६ धावा केल्या आहेत. त्यानंतर बुमराह नाराज दिसून आला.
The average Delhi vs Mumbai debate in comments section 🫣
Don’t miss @ImRo45 ‘s reaction at the end 😁
Watch the LIVE action ➡ https://t.co/QAuja88phU#IPLonJioStar 👉 #DCvMI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/FPt0XeYaqS
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
करुण नायरने चांगली फलंदाजी करत पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच करुणने आपले अर्धशतक पूर्ण केले. ६ षटकांनंतर टाइम आउट घेण्यात आला होता, त्यानंतर बुमराह करुणकडे गेला आणि काहीतरी बोलताना दिसून आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नायर दोन धावा घेत असताना दुसऱ्या टोकावरील बुमराहल जाऊन आदळला. त्यानंतर करुणने त्याची माफी मागितली. यानंतर देखील बुमराह संतपुन करुण नायरसोबत वाद घातला. नंतर करुण नायरने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला सांगितले की, बुमराह खूप रागावलेला दिसत आहे आणि नंतर संपूर्ण प्रकरण शांत झालेले दिसून आले.
मुंबई इंडियन्सचा वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा या वादविवादाचा आनंद घेत असल्याचे समोर आले आहे. त्याला या गंमतीचा आनंद मिळत होता असे दिसून येत आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून रोहित बुमराहला शांत करू शकला असता, मात्र त्याने त्या वादाचा आनंद लुटणे पसंत केले. तथापि, याबाबत रोहितची मजेदार प्रतिक्रिया सध्या व्हायरल झाली आहे.
27 (16) – शिखर धवन (SRH), 2016
२६ (९) – करुण नायर (डीसी), २०२५*
२५ (११) – राहुल त्रिपाठी (केकेआर), २०२१
२५ (९) – वृद्धिमान साहा (जीटी), २०२२
२३ (१२) – विराट कोहली (आरसीबी), २०१५
२६ – पॅट कमिन्स (केकेआर), २०२२
२० – डीजे ब्राव्हो (सीएसके), २०१८
१८ – करुण नायर (डीसी), २०२५*
17 – फाफ डू प्लेसिस (CSK), 2021