युवराज सिंग नव्या भूमिकेत दिसणार? (फोटो- ians)
समोर आलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग लवकरच आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच म्हणून युवराज सिंग म्हणून दिसण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएलमध्ये युवराज सिंग सपोर्ट स्टाफमध्ये काम करताना दिसण्याची शक्यता आहे. ही माहिती खरी असल्यास युवराज सिंग कोच म्हणून कार्य करताना दिसून शकतो.
युवराज सिंगने युवा क्रिकेटर, खास करून स्फोटक फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्मासोबत मेंटर म्हणून कार्य केले आहे. याचा फायदा अभिषेक शर्माला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युवराज सिंग कोच म्हणून जोडले गेल्यास दिल्ली कॅपिटल्सला फायदा होणार आहे.
मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला?
भारताचा दिग्गज माजी खेळाडू, युवराज सिंग याची कहाणी येणाऱ्या अनेक पिढ्यांना वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील. २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगने, दीर्घकाळापर्यंत कर्करोगाशी लढा दिला. २०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराज कर्करोगाने ग्रस्त होता; असे असूनही, त्याने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार पटकावला. डॉक्टरांनी आपल्याला जगण्यासाठी केवळ तीन ते सहा महिने उरले असल्याचे सांगितले होते, असा खुलासा युवराजने केला आहे.
“…नाहीतर माझी दाढी काढून टाकेन”, अर्जुन तेंडूलकरबाबत दाव्यानंतर ‘या’ दिग्गजाचं मोठं विधान
कर्करोगावर मात केल्यानंतर, युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. या आजाराविरुद्धचा लढा यशस्वीपणे जिंकल्यानंतर, सप्टेंबर २०१२ मध्ये त्याने एक अत्यंत भावुक पुनरागमन केले. त्यानंतर, युवराजला २०१४ च्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधीही मिळाली. त्याने २०१९ पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व करणे सुरूच ठेवले, तरीही या काळात त्याला संघातून आत-बाहेर होण्याच्या अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला.






