इंडियन प्रीमियर लीग (फोटो- सोशल मिडिया)
झहीर खानने घेतलेली सर्वात पहिली विकेट
२०२६ मध्ये जेकब डफीने मिळवली पहिली विकेट
आज मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात रंगणार सामना
Tata IPL 2026 Live: कालपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात झाली आहे. यंदाचा 19 वा हंगाम ऐतिहासिक ठरणार आहे. 2008 मधील पहिल्या सीझनपासून ते आता सुरू झालेल्या आयपीएल हंगामात आयपीएलने क्रिकेट विश्वाला अनेक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. तर आज आपण प्रत्येक हंगामात पहिली विकेट कोणी घेतली, ते गोलंदाज (Cricket) कोण होते, त्याबाबत जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2026 ची सुरुवात झाली आहे. काल झालेल्या सामन्यात बंगलोरने हैद्राबादचा पराभव केला आहे. या हंगामात पहिली विकेट घेण्याचा रेकॉर्ड जेकब डफीने केला आहे. आयपीएल स्पर्धेची सुरुवात 2008 पासून झाली आहे. आज आपण 2008 पासूनच्या हंगामात पहिली विकेट कोणी कोणी घेतली त्यांची नावे जाणून घेऊयात. यामध्ये अनेक मोठ्या आणि प्रमुख गोलदाजांचा समावेश आहे.
रूको जरा सब्र करो! MI चा ‘सिक्सर किंग’ येतोय; IPL 2026 मध्ये पलटण 14 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडणार?
पहिली विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी खालीलप्रमाणे-
२००८ झहीर खान (RCB)
२००९ थिलन तुषारा (CSK)
२०१० चमिंडा वास (Deccan)
२०११ अनिरुद्ध श्रीकांत (CSK)
२०१२ ब्रेट ली (KKR)
२०१३ लसिथ मलिंगा (MI)
२०१४ लसिथ मलिंगा (MI)
२०१५ मोर्ने मॉर्केल (KKR)
२०१६ इशांत शर्मा (RPS)
२०१७ युझवेंद्र चहल (RCB)
२०१८ दीपक चहर (CSK)
२०१९ हरभजन सिंग (CSK)
२०२० पियुष चावला (CSK)
२०२१ हर्षल पटेल (RCB)
२०२२ मोहम्मद शमी (GT)
२०२३ मोहम्मद शमी (GT)
२०२४ मुस्तफिजुर रहमान (CSK)
२०२५ मोहम्मद सिराज (RCB)
२०२६ जेकब डफी (RCB)
मुंबई पलटण 14 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडणार?
मुंबई इंडियन्स आपला आजचा सामना जिंकून 14 वर्षांपासूनची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करेल. आज मुंबई पलटण याच इराद्याने मैदानात उतरेल. तर 14 वर्षांपासून असलेला तो रेकॉर्ड कोणता आहे ते पाहुयात. मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र गेले 14 वर्षांपासून त्यांना लीगमध्ये पहिला सामना जिंकता आलेला नाहीये. त्यामुळे आज हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मुंबई संघाकडे असणार आहे.
वानखेडेवर सन्नाटा! KKR विरुद्ध MI च्या संघाला ‘ग्रहण’; Bumrah अन् ‘या’ खेळाडूंशिवाय लढावे लागणार?
मुंबई इंडियन्स संघाने 2012 मध्ये पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर 2025 पर्यंत मुंबई आपला पहिला सामना जिंकू शकलेली नाहीये. त्यामुळे आज मुंबई पलटण आपला 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. दरम्यान दुसऱ्या संघाबाबत विचार केल्यास कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एवढा काही खास रेकॉर्ड राहिलेला नाही.






