गंगाखेडच्या गावामध्ये मोबाईल टॉवरच्या २३ बॅटऱ्यांची चोरी झाली (फोटो - सोशल मीडिया)
Crime News : गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असुन मोबाईल टॉवर बॅट-या व शेतातील वायर, विद्युत मोटारी चोरी होत आहेत. तालुक्यातील खळी येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला असुन होणाऱ्या चोऱ्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गंगाखेड तालुक्यात (Parbhani News) खळी शिवारात असलेल्या मोबाईल टॉवर मिशन लावलेल्या २३ बॅटरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या आहेत. याची नवीन भावाप्रमाणे एकूण किंमत १ लाख ८१ हजार ५०० रुपये असल्याचे गंगाखेड पोलिसांनी सांगितले. (Crime News)
फिर्यादी रवी भिसे (क्षत्रिय अधिकारी) यांच्या तक्रारी वरून दि. २६ मार्च रोजी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांवर चोरट्यांची नजर असून आत असलेल्या किंमती धातूंमुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मोबाईल नेटवर्क सेवा अखंडित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास टॉवर सुरू ठेवण्याचे महत्त्वाचे काम या बॅटऱ्या करतात. मात्र या बॅटऱ्यांमध्ये असलेल्या किंमती धातूंमुळे त्यांना काळ्या बाजारात – मागणी वाढली असून चोरीच्या घटनांमध्ये – वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा : तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
नेटवर्क सेवेला धोका; चोरीचे सत्र सुरूच
मोबाईल टॉवरवर बसविलेल्या मोठ्या क्षमतेच्या बॅटऱ्या वीज गेल्यानंतर काही तास नेटवर्क सेवा सुरू ठेवतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही मोबाईल सेवा बंद पडत नाही. या बॅटऱ्या वजनाने जड आणि उच्च क्षमतेच्या असल्याने त्यामध्ये शिसे (लीड), तांबे, अॅल्युमिनियम यांसारख्या किंमती धातूचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो, काही नव्या लिथियम आयन बॅटऱ्याऱ्यांमध्ये लिथियम, निकेल, कोबाल्ट यांसारख्या महागड्या धातूंचाही समावेश असतो. विशेष म्हणजे, या बॅटऱ्याऱ्यांचे वजन अनेकदा शेकडो किलोपर्यंत असल्याने स्क्रॅपमध्ये विक्री केल्यास चांगली रक्कम मिळते, त्यामुळे चोरट्यांकडून टॉवर परिसरात घुसून बॅटऱ्या चोरण्याच्या घटना निशाण्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास टॉवर सुरू ठेवण्याचे महत्त्वाचे काम या बॅटऱ्या करतात. मात्र या बॅटऱ्यांमध्ये असलेल्या किंमती धातूंमुळे त्यांना काळ्या बाजारात मागणी वाढली असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा : भेटायला आला आणि घराच्या अंगणात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती; 19 वर्षीय तरुण ताब्यात
घडत असल्याचे समोर येत आहे. बॅटरी काढताना त्यातील अॅसिडमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही, दरम्यान, मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी टॉवर परिसरात सुरक्षा वाढविणे, सीसीटीव्ही बसविणे तसेच स्थानिक प्रशासनाने गस्त वाढविणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. अन्यथा मोबाईल टॉवरवरील बॅटन्यांच्या चोरीमुळे नेटवर्क सेवा खंडित होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खळी शिवारात झालेल्या मोबाईल टॉवरवरील बेंट या चौरी प्रकाराने मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या या सुरक्षित नसल्याचे दिसून येते.






