
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा फोन सगळ्यात महागडा आहे. याची किंमत 1,74,999 रुपयांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेल 2,34,999 रुपयांपर्यंत जातं. ज्यांना मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कॉल करायचा आहे, एकाच वेळी दोन-तीन कामं करायची आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. यात 7.6 इंचाची आतली स्क्रीन आणि 5.5 इंचाची बाहेरची स्क्रीन आहे. दोन्ही AMOLED आहेत आणि 120Hz आहेत. यात Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे, 16GB रॅम आहे. 50MP चे दोन कॅमेरे आहेत आणि 4800mAh बॅटरी आहे. Ganesh Chaturthi 2026:
फोटो काढायची आवड असेल तर Pixel सारखा फोन नाही. याची किंमत 89,999 रुपयांपासून सुरु होते. ज्यांना एकदम भारी फोटो आणि क्लीन सॉफ्टवेअर हवंय त्यांनी हा घ्यावा.यात 6.3 इंचाची OLED स्क्रीन आहे, 120Hz रिफ्रेश रेट आहे. आतमध्ये Google चा स्वतःचा Tensor G6 चिपसेट आहे आणि Gemini AI चे फीचर्स आहेत. 48MP चा मेन कॅमेरा आहे ज्यात टेलिफोटो आणि अल्ट्रावाईड लेन्स आहे. 4985 mAh बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंग आहे.
vivo ची S सिरीज परत आली आहे. याची किंमत 39,999 ते 44,999 च्या मध्ये आहे. ज्यांना दिसायला भारी फोन हवा आणि बॅटरी पण मोठी हवी त्यांच्यासाठी हा आहे.यात 6.83 इंचाची वाकडी म्हणजे curved AMOLED स्क्रीन आहे. MediaTek Dimensity 7360 Turbo प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे. मागे 50MP + 2MP कॅमेरा आणि पुढे 32MP सेल्फी कॅमेरा आहे. 7,050 mAh ची मोठी बॅटरी आहे आणि 44W चार्जिंग आहे.
ज्यांना दिवसभर फोन वापरायचा आहे त्यांच्यासाठी हा फोन आहे. याची किंमत 27,999 रुपयांपासून सुरु होते. सणाच्या दिवसात सारखं चार्जिंग करायला लागू नये म्हणून यात मोठी बॅटरी दिली आहे.6.99 इंचाची मोठी AMOLED स्क्रीन, Snapdragon 4 Gen 4 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8,000 mAh ची बॅटरी आहे. 45W फास्ट चार्जिंग पण आहे.
Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
पहिल्यांदा फोन घेताय किंवा कोणाला गिफ्ट द्यायचा आहे तर हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. किंमत फक्त 25,999 रुपयांपासून सुरु होते.यात 6.8 इंचाची मोठी स्क्रीन आहे आणि 144Hz रिफ्रेश रेट आहे. Dimensity 6300 प्रोसेसर, 50MP मागचा कॅमेरा आणि 8MP पुढचा कॅमेरा आहे. 7,000 mAh बॅटरी आणि 45W चार्जिंग आहे.
बॅटरी: जर तुम्ही दिवसभर पंडालमध्ये फिरणार असाल तर मोठी बॅटरी बघा. Redmi Note 17 मध्ये 8000 mAh आणि vivo S2 मध्ये 7050 mAh बॅटरी आहे.
कॅमेरा: सणाचे फोटो चांगले यायला हवेत तर Pixel 11 आणि Fold8 चे कॅमेरे एक नंबर आहेत.
बजेट: 30 हजाराच्या आत हवाय तर realme 16X आणि Redmi Note 17 बघा. 40 हजाराच्या आसपास vivo S2 चांगला आहे. आणि पैसे असतील तर Pixel आणि Fold8 घ्या.
Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग
बजाज फायनान्स या गणपतीला झिरो डाउन पेमेंटवर फोन देत आहे. फक्त 830 रुपयांपासून हप्ता सुरु होतो. तुम्ही 3 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत हप्ता करू शकता.जवळच्या बजाजच्या दुकानात जा, फोन निवडा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि तुम्हाला हप्ता मिळेल का ते समजेल. हप्ता निवडा आणि त्याच दिवशी नवीन फोन घरी घेऊन जा.