आजकाल टेलिकॉम कंपन्या कमी किमतीत जास्त फायदे असलेले प्लॅन (Airtel) ऑफर लाँच करत आहेत. अशातच आता Airtel ने ग्राहकांसाठी 149 रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्या अंतर्गत अनेक OTT बेनिफिट्स देखील मिळतील. इथे हे जाणून घ्या की, एअरटेलकडे आधीच 148 रुपयांचा प्लॅन आहे, मात्र नवीन 149 रुपयांचा प्लॅन त्यापेक्षा वेगळा आहे. तसं बघितलं तर हे दोन्ही फक्त डेटा पॅक आहेत. आज आपण 149 रुपयांच्या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेऊयात. (Airtel Data Plan)
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटा मिळेल. या प्लॅनची (Airtel Data Plan) व्हॅलिडिटी ग्राहकांच्या सध्याच्या पॅकएवढीच असेल. जर आपल्याकडे आधीच 30 दिवसांचा प्लॅन असेल तर त्याची व्हॅलिडिटीदेखील 30 दिवसांसाठी राहील. या प्लॅनमध्ये 1GB डेटासहीत, ग्राहकांना 30 दिवसांसाठी Xstream प्रीमियमचा एक्सेस देखील मिळेल. Xstream Premium हा Airtel चे एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे ग्राहकांना एकाच App मध्ये 15 + OTT प्लॅटफॉर्मचा कंटेंट अॅक्सेस मिळतो.
या प्लॅनद्वारे जास्तीत जास्त लोकांना Xstream Premium कडे आणणे हा कंपनीचा यामागील उद्देश आहे. या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटाच मिळत असल्याने जास्त डेट पॅक लागणाऱ्या लोकांसाठी हा प्लॅन योग्य ठरणार नाही. एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनचे सबस्क्रिप्शन घेऊन ग्राहकांना फक्त 30 दिवसांसाठी Xstream प्रीमियममधील एक्सेस सोबतच 1GB डेटा देखील मिळेल. जर आपल्याला फक्त डेटा प्लॅन घ्यायचा असेल तर आपण 148 रुपयांच्या प्लॅनकडे जाऊ शकता, कारण त्यामध्ये 15GB डेटा उपलब्ध आहे.