काय घडलं नेमकं?
दोन्ही हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते. विद्यार्थी क्लबमध्ये येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात ३० सेकंदात दहावीच्या विद्यार्थ्यावर २७ वेळा चाकूने वार केले आहे. पीडितेच्या हाताला १० हुन अधिक खोल जखमा झाल्या, दोन बोटे कापली गेली आणि त्याच्या खांद्यावर आणि पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे.
Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार
पीडित अल्पवयीन मुलाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी मारहाणीच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोटीस बजावल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना सोडण्यात आलं आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
का केला हल्ला
हल्लेखोर आणि पीडित एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी क्लबमध्ये झालेल्या वादात कानाखाली मारण्याच्या घटनेमुळे हे शत्रुत्व निर्माण झालं. पूल गेममध्ये वर्चस्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!
मध्यप्रदेश येथे एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. एका प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यांनतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्याने बदला घेण्यासाठी काही खासगी फोटो देखील व्हायरल केले. एवढेच नाही तर प्रेयसीची आत्मा बोलावण्यासाठी त्याने अघोरी कृत्य देखील केल्याचे समोर आले आहे. ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण
Ans: पूर्वीच्या वादातून निर्माण झालेलं वैमनस्य.
Ans: गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू.
Ans: गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू.






