भारतात प्रामुख्याने तीन टेलिकॉम ऑपरेटर आहेत, ज्यात Jio, Airtel आणि Vi यांचा समावेश आहे. हे तिन्ही टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आणि खास प्लॅन आणत असतात. यामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड योजनांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तिन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. एअरटेलने 3 जुलैपासून मोबाइल दरात वाढ करणार असल्याचेही जाहीर केले होते. यानंतर कंपनीच्या प्लॅनची किंमत वाढवली असली तरी प्लॅनचे फायदे कमी झालेले नाहीत.
रिचार्ज प्लॅनच्या वाढीनंतर अनेक युजर्स नाराज झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीत, तुम्ही एअरटेलच्या या प्लानकॅच विचार करू शकता ज्यात तुम्हाला दोन कनेक्शनसह अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळेल. म्हणजेच यानुसार, आता एअरटेलच्या एका रिचार्जवर दोन युजर्स याचा लाभ घेऊ शकतील. या रिचार्ज प्लॅनच्या किमतीबद्दल बोलणे केले तर, याची किंमत 699 रुपये आहे. हा प्लॅन अनेक युजर्ससाठी आता फायद्याचा ठरत आहे. चला तर मग या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Jio घेऊन आला धमाकेदार ऑफर, आता 1 महिन्यासाठी मोफत WiFi मिळणार! सविस्तर जाणून घ्या