
AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फीचर्सचा जलवा आणि बॅटरीची कमाल… नवा Oppo स्मार्टफोन यूजर्ससाठी ठरणार खास, किंमत केवळ इतकी
मोटोरोलाने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत USD 499.99 म्हणजेच सुमारे 46,190 रुपये ठेवण्यात आली आहे. 16 एप्रिलपासून स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून ग्राहक हा स्मार्टफोन बेस्ट बाय, ॲमेझॉन, मोटोरोला आणि गूगल फायवरून खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Motorola)
Supercharge your creativity with the new moto g stylus – 2026, featuring a built-in active stylus, a pro-grade camera system, and a 6.7’’ Super HD display⚡🎨 Learn more: https://t.co/DrbWPgeKN4 pic.twitter.com/lPRktjUrmy — motorolaus (@MotorolaUS) April 7, 2026
मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे. फोनमध्ये 10-बिट कलर आणि 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये खास वॉटर टच टेक्नोलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही ओल्या हातांनी देखील फोनचा वापर करू शकणार आहेत.
कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये सर्वात खास इन-बिल्ट अॅक्टिव Stylus आहे, जे टिल्ट आणि प्रेशर सेंसिटिविटीला सपोर्ट करते. इन-बिल्ट अॅक्टिव Stylus मोटोरोलाच्या नोट्स अॅपसह इंटीग्रेट करण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्केच टू ईमेज आणि हँडराईटिंग कॅल्क्युलेटर सारख्या AI टूल्सचा वापर करू शकता. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्विक क्लिप, हवर टू मॅग्नीफाई आणि सर्कल टू सर्च फीचर्स देखील दिले आहेत.
फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 (4nm) चिपसेट देखील दिला आहे. या फोनमध्ये एड्रेनो 710 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर 5एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 3.1 स्टोरेज देखील मिळणार आहे.
कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5200mAh बॅटरी देखील दिली आहे.
गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल
मोटोरोलाच्या नव्या डिव्हाईसमध्ये OIS आणि ऑल-पिक्सेल ऑटोफोकस वाला 50MP सोनी लिटिया 700C प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 13MP चा अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो कॅमेरा देखील दिला आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये 3-इन-1 लाइट सेंसर देखील दिला आहे. जो एक्सपोजर अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करतो. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 32MP चा कॅमेरा दिला आहे, जो ग्रुप फोटो काढताना फ्रेमिंग आपोआप एडजस्ट करू शकतो. तसेच, या डिव्हाइसमध्ये फोटो एन्हांसमेंट इंजिन, सुपर झूम, ॲक्शन शॉट आणि पोर्ट्रेट मोड यांसारखी एआय वैशिष्ट्येही आहेत.