Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी
ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. 3 दिवस सुरू असणाऱ्या या सेलमधे ॲमेझॉन प्राईम मेंबर्सना विशेष फायदा होणार आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्सना एक्सक्लुझिव्ह ऑफर्स मिळणार आहेत. हे भारतातील ॲमेझॉन प्राईम सेलचे 10 वे एडिशन आहे. यानिमित्ताने कंपनी त्यांच्या प्राईम सबस्क्रिप्शनवर देखील डिस्काऊंट ऑफर करत आहे. ग्राहकांना कार्ड पेमेंटवर जास्तीचे डिस्काउंट मिळावे यासाठी कंपनीने एस आणि ॲक्सिस बँकसोबत हातमिळवणी केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 4 जुलै पासून सुरू होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, अमेझॉन प्राईम डे सेलचे भारतातील 10 वे एडिशन 4 ते 6 जुलै या काळात आयोजित केले जाणार आहे. हा 3 दिवसांचा शॉपिंग ईव्हेंट 4 जुलै रोजी रात्री 12 वाजता सुरू होणार आहे आणि 6 जुलै रोजी रात्री 11.59 वाजता संपणार आहे. यामध्ये प्राईम मेंबर्सना ऑफर्स आणि डिस्काउंटसह शॉपिंग करण्यासाठी 72 तासांचा वेळ मिळणार आहे. सेलदरम्यान एसबीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या यूजर्सना निवडक खरेदीवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
सेलच्या 10 व्या एडीशनच्या निमित्ताने ॲमेझॉन एक एआय पावर्ड पर्सनलाइज्ड ‘प्राईम प्लेबॅक’ फीचर ऑफर करणार आहे, जे यूजर्सच्या शॉपिंग माइलस्टोन्स, सेविंग्स आणि फेवरेट स्ट्रीमिंग कंटेंटला हाइलाइट करणार आहे. हे फीचर 18 जूनपासून निवडक प्राईम मेंबर्सना दिसण्यास सुरुवात होणार आहे. ॲमेझॉनने सांगितलं आहे की, यावर्षी प्राईम डे सेलमध्ये वनप्लस आणि सॅमसंग सारख्या लोकप्रिय ब्रँडचे 500 हून अधिक नवीन प्रोडक्ट्स उपलब्ध असणार आहेत.
प्राईम डे च्या 10 व्या एडीशननिमित्त ॲमेझॉन नव्या सब्सक्राइबर्ससाठी लिमिटेड-टाइम मेंबरशिप ऑफर्स घेऊन आला आहे. या ऑफर्सअंतर्गत स्टँडर्ड ॲन्युअल मेंबरशिप आता 1,499 रुपयांऐवजी केवळ 999 रुपयांना मिळणार आहे. तर प्राईम लाईट प्लॅनची किंमत 799 रुपयांऐवजी 599 रुपये प्रति वर्ष होणार आहे. प्राईम शॉपिंग एडीशन प्लॅनची किंमत 399 रुपयांऐवजी 299 रुपये होणार आहे. तसेच ग्राहक प्रोडक्ट्स शोधण्यासाठी आणि ऑर्डर प्लेस करण्यासाठी Rufus सारख्या एआय टूल्सचा देखील वापर करू शकणार आहेत.






