Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी 'या' गोष्टी तपासा
चार्जिंग केसवर धूळ जमा झाल्यास देखील ईअरबड्स खराब होऊ शकतात. कारण जेव्हा आपण दिर्घकाळापर्यंत ईअरबड्सचा वापर करतो, तेव्हा आपल्या कानातील मळ आणि आजूबाजूची धूळ इअरबड्सच्या चार्जिंग पॉईंटवर जमा होऊ लागते. याशिवाय, ज्या चार्जिंग केसमध्ये आपण ईअरबड्स ठेवतो, त्यामध्ये देखील धूळ जमा होऊ लागते. धुळीमुळे ईअरबड्स आणि केसचे मेटल एकमेकांना स्पर्श करू शकत नाही. यामुळे ईअरबड्स चार्ज करताना समस्या येतात आणि ते व्यवस्थित काम करू शकत नाहीत. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रत्येकवेळी ईअरबड्समध्येच समस्या असणं गरजेचं नाही. अनेकदा तुमच्या फोनच्या ब्लूटूथ कनेक्शनमध्ये देखील काही समस्या असू शकतात, ज्यामुळे ईअरबड्स योग्य पद्धतीने काम करत नाहीत. जेव्हा तुमचा फोन आणि ईअरबड्स यांच्यातील कनेक्शन योग्य पद्धतीने काम करत नसेल तेव्हा ईअरबड्समधून आवाज येणं बंद होतं. ही समस्या सोडवण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ब्लूटूथ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या ईअरबड्स डिव्हाईसचे नाव शोधा आणि त्याला फॉरगेट डिव्हाईस करून त्यानंतर पुन्हा कनेक्ट करा. असे केल्यास ईअरबड्स पुन्हा व्यवस्थित काम करू शकतात.
अनेक लोकांची एकच समस्या असते की, ईअरबड्स जुने झाल्यानंतर केवळ एकाच बाजूने आवाज ऐकू येतो. याला सिंगल इयरबड नॉट वर्किंग समस्या म्हटलं जाते. जेव्हा दोन्ही ईअरबड्सचे कनेक्शन एकमेकांपासून तुटते, तेव्हा ही समस्या निर्माण होते. ही समस्या ठीक करण्यासाठी ईअरबड्स पूर्णपणे रिसेट करणं गरजेचं आहे. प्रत्येक कंपनीचे ईअरबड्स रिसेट करण्याची पद्धत वेगवेगळी असते.






