सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा 'डिजिटल डिटॉक्स' स्मार्टफोन... फीचर्स वाचून व्हाल चकित
खरं तर Commodore हे 1980 च्या दशकात कंप्यूटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातील एक प्रतिष्ठित नाव होते. ओरिजनली पर्सनल कंप्यूटर रिवोल्यूशनची सुरुवात करण्यासाठी हा ब्रँड ओळखला जात होतो. मात्र यानंतर काही वर्षांनी आर्थिक अस्थिरतेमुळे या कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता आणि याचे प्रोडक्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. 2015 मध्ये कंपनीने काही अयशस्वी अँड्रॉइड फोन्ससाठी आपल्या नावाचा परवानाही दिला होता. या सर्वांनंतर आता कंपनीने जोरदार कमबॅक करत Commodore Callback 8020 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक रेट्रो-इंस्पायर्ड फ्लिप फोन आहे, जो डिजिटल डिटॉक्स डिव्हाईस स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Commodore)
Commodore Callback 8020 च्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत $499 म्हणजेच सुमारे 47,100 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिअंट बेज, व्हाइट आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे एक ट्रांसलूसेंट ब्लू व्हेरिअंट देखील लाँच केले आहे. ज्याची किंमत $549.99 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे. तसेच, गोल्ड फिनिश असलेल्या लिमिटेड-एडिशन ‘फाउंडर्स एडिशन’ मॉडेलची किंमत $640 म्हणजेच सुमारे 60,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, स्मार्टफोनची प्री ऑर्डर 30 जूनपासून सुरु होणार आहे. तर या वर्षाच्या अखेरपर्यंत स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा नवीन स्मार्टफोन डिजिटल वेल-बीइंग (डिजिटल आरोग्य आणि सुस्थिती) लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने हे नवीन डिव्हाईस एक ‘डिजिटल डिटॉक्स’ फ्लिप-स्टाइल फोन म्हणून लाँच केले आहे. हे डिव्हाईस गरजेपेक्षा जास्त स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. यासाठी हँडसेट पारंपारीक वेब ब्राउजर्स आणि सोशल मीडिया अॅप्सना ब्लॉक करते. या डिव्हाईसध्ये व्हॉट्सॲप, सिग्नल, स्पॉटिफाय, क्यूआर कोड टूल्स, नेविगेशन अॅप्स आणि ओपन-सोर्स मेसेजिंग अॅप ओपनबबल सारख्या महत्त्वाच्या सेवांचा सपोर्ट देण्यात आला आहे.
कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये Sailish ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. यामध्ये Linux बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. Callback 8040 मध्ये कंपनीने 1.77 इंच कवर डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 3.25 इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये टचस्क्रीनला बाईडिफॉल्ट डिसेबल करण्यात आले आहे आणि केवळ सपोर्टेड ॲप्ससोबतच त्याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये फिजिकल कीपॅड देण्यात आले आहे. ज्याचा वापर कॉलिंग आणि मेसेज इत्यादीसाठी केला जाऊ शकतो.
भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….
या स्मार्टफोनमध्ये LED नोटिफिकेशन इंडिकेटर देण्यात आला आहे. याचे रियर कवर कस्टमाइज करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. हा फ्लिप स्टाइल फोन मीडियाटेक हेलिओ चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. कंपनीने त्यांच्या नवीन फोनसह 32GB मेमरी कार्ड देखील दिले आहे. Commodore Callback 8020 मध्ये 48MP चा रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी देखील यामध्ये एक कॅमेरा दिला आहे. नवीन फोन 1,550mAh डिव्हाईसने सुसज्ज आहे.






