Amazon ची ग्राहकांसाठी दिल खुश ऑफर! केवळ 1000 रुपयांहून कमी ईएमआयवर घरी घेऊन या हे ढासू स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स
आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात आधी त्याची कॅमेरा क्वालिटी तपासतो. कारण कोणत्याही स्मार्टफोनमधील महत्त्वाचं फीचर म्हणजे त्याची कॅमेरा क्वालिटी. जर स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी चांगली असेल आणि किंमत कमी असेल तर स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढते. फोन खरेदी करताना प्रत्येकजण कॅमेऱ्याकडे आवर्जुन लक्ष देतो. युजर्सची हीच मागणी लक्षात घेऊन टेक कंपन्या देखील त्यांच्या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी वाढवण्यावर भर देतात.
BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?
तुम्ही उत्तम कॅमेरा क्वालिटी असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India वर उपलब्ध असलेल्या काही निवडक स्मार्टफोनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी सर्वोत्तम असल्याचा दावा केला जातो. या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही हे स्मार्टफोन 1000 रुपयांपेक्षा कमी ईएमआयवर घरी घेऊन येऊ शकता. यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही आणि तुम्हाला उत्तम वैशिष्ट्यांसह फोन देखील मिळेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
Xiaomi चा Redmi 13 हा सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे, जो 6GB RAM, 128GB स्टोरेज आणि SD 4 Gen 2 चिपसह लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या हँडसेटमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 6.79-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची किंमत 12,498 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून 606 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.
Realme 12 5G स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यात डायनॅमिक बटण उपलब्ध आहे. या हँडसेटची किंमत 14,048 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून 681 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.
या स्मार्टफोनमध्ये इन्फ्रारेड आणि NFC ची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि एआय फीचर्स देण्यात आले आहेत. यात D6300 प्रोसेसर आणि 108MP कॅमेरा आहे. त्याची किंमत 13,999 रुपये आहे आणि तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून केवळ 679 रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन येऊ शकता.
एकट्यात महिला कोणत्या अॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात Snapdragon 695 प्रोसेसर आहे. त्याची किंमत 18,999 रुपये आहे. यावर 921 रुपयांचा ईएमआय दिला जात आहे.
या स्मार्टफोनमध्ये 108MP आणि AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल आहे. या फोनमध्ये एआय फीचर्ससह MagicOS 8.0 आहे. त्याची किंमत 18,998 रुपये आहे. Amazon या स्मार्टफोनवर 921 रुपयांच्या ईएमआयची ऑफर देत आहे.