apple event (फोटो- सोशल मिडिया)
ॲपल एक जगप्रसिद्ध टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन वापरण्याची क्रेझ तरुणाईसह सर्वांमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र यंदा ॲपल कंपनी आपल्या या इवेंटमध्ये स्टँडर्ड आयफोन 18 मॉडेल आणणार नसल्याचे समजते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 18, iPhone 18e आणि iPhone Air 2 सोबत पुढील वर्षी स्टँडर्ड आयफोन 18 सादर केला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
येत्या 9 सप्टेंबरच्या इवेंटमध्ये कंपनी केवळ प्रीमियम मॉडेल्स सादर करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स यांचा समावेश असू शकतो. तसेच नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असणारी नवीन चिपसेट आणि व्हेरीएबल -प्रायमरी कॅमेरा कंपनी लॉंच करू शकते.
या इवेंटमध्ये सर्वात मोठी उत्सुकता चाहत्यांना फोल्डेबल आयफोनची असणार आहे. कंपनी यंदा फोल्डेबल आयफोन सादर करण्याची शक्यता आहे. याला कंपनी आयफोन अल्ट्रा किंवा आयफोन फोल्ड असे नाव दिले जाण्याचा अंदाज आहे. यामध्ये यूजर्सना 7.6 इंच स्क्रीन आणि टायटॅशियम फ्रेम दिली जाण्याची शक्यता आहे.
Counting down with everyone! https://t.co/FhRumftT4S — Tim Cook (@tim_cook) August 26, 2026
ॲपल कंपनीने यंदा आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. यंदा स्टँडर्ड आयफोन 18 सादर केला जाणार नाहीये. हा फोन पुढील वर्षी अन्य फोनसोबत सादर केला जाऊ शकतो. या इवेंटमध्ये Apple Watch Series 12, Apple Watch Ultra 4, AirPods 5, Software Updates ही प्रोडक्टस लॉंच केली जाऊ शकतात.
समोर आलेल्या काही लीक्सनुसार, आयफोन अल्ट्रामध्ये 7.8 इंचाचा मुख्य आणि 5.5 इंचाचा कवर डिस्प्ले मिळू शकतो, जो एका टॅब्लेटसारखा अनुभव ऑफर करणार आहे. अनफोल्ड झाल्यानंतर आयफोनची जाडी 4.5mm राहू शकते. ॲपलने डिस्प्लेवर सुरकुत्या पडणार नाहीत यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि फोन लाँच झाल्यावर त्याचे परिणाम दिसून येतील.






