
Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत
कंपनीचं असं म्हणणं आहे की, म्यूजिक लाइसेंसिंगच्या वाढत्या किंमतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापी, सर्वात महत्त्वाचे म्हणजेच किंमती वाढल्यानंतर देखील यूजर्सना कोणत्याही प्रकारचे नवीन फीचर्स पाहायला मिळणार नाहीत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता यूजर्सना ॲपल म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
ॲपल म्युझिकच्या इंडिव्हिज्युअल प्लॅनची किंमत आता 139 रुपये प्रती महिना झाली आहे. तर यापूर्वी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 119 रुपये खर्च करावे लागत होते. तर फॅमिली प्लॅनची किंमत यापूर्वी 179 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 229 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. इतकंच नाही, यापूर्वी स्टूडेंट प्लॅनची किंमत 59 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 69 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. या नवीन किंमती ॲपलच्या वेबसाईटवर देखील अपडेट झाल्या आहेत.
केवळ ॲपल म्युझिकच नाही तर कंपनीने ॲपल वन सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीत देखील वाढ केली आहे. ॲपल वनच्या बंडल प्लॅनमध्ये ॲपल म्युझिक, ॲपल टीव्ही+, ॲपल आर्केड, आयक्लॉड+, ॲपल फिटनेस+ आणि काही देशांमध्ये ॲपल न्यूज+ या सर्वित्र एकत्र ऑफर केल्या जातात. त्यामुळे हा बंडल प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात.
ॲपल वन इंडिव्हिज्युअल प्लॅनची किंमत यापूर्वी 175 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 195 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. तर ॲपल वन फॅमिली प्लॅनची किंमत यापूर्वी 235 रुपये होती. मात्र आता या प्लॅनसाठी यूजर्सना 295 रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. तसेच, ॲपल वन प्रीमियर प्लॅनच्या खरेदीसाठी आता 899 रुपयांऐवजी 995 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत.