6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा... Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB + 256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खेरदीवर 3 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट देखील मिळणार आहे. यानंतर स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून ॲमेझॉनवर सुरु होणार आहे. सायप्रस ग्रीन, मिस्टी पर्पल आणि नेब्युला टायटॅनियम या 4 रंगांच्या पर्यायांत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Tecno)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 1208 x 2644 पिक्सेल आहे. फोनमध्ये दिलेल्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो.
टेक्नोचा हा फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्टीमेट चिपसेटला सपोर्ट करतो. हा फोन 8 जीबीचे एलपीडीडीआर5एक्स रॅमसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 जीबी वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस HiOS 16 वर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन मल्टीटास्किंग आणि स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो.
टेक्नोच्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT700C प्रायमरी लेंस दिला आहे. ज्यासोबत 50 मेगापिक्सेल 3x टेलिस्कोप पेरिस्कोप सेंसर आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेंस देण्यात आला आहे. यासोबतच एलईडी फ्लॅश देखील दिले आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, फोनची बॅटरी पाच वर्षांपर्यंत टिकेल. या फोनला MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि त्याला IP66 + IP68 + IP69 रेटिंग देखील आहे.






