iPad Air: पावरफुल M3 चिपसह लाँच झालं Apple चं नवीन डिव्हाईस, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Apple ने नवीन iPad Air लाँच केला आहे. हे कंपनीचं नवीन डिव्हाईस M3 चिपवर चालते. कंपनीने एक नवीन मॅजिक कीबोर्ड देखील सादर केला आहे, ज्यामध्ये फ्लोटिंग डिझाइन, मोठा ट्रॅकपॅड आणि एक नवीन 14-की फंक्शन रो समाविष्ट आहे. नवीन iPad Air मॉडेल्स 11-इंच आणि 13-इंच या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत आणि त्यांची किंमत मागील iPad Air मॉडेल्सइतकीच आहे. याचा अर्थ किंमतीत कोणतीही वाढ किंवा कोणताही बदल झालेला नाही आणि नवीन टॅबलेट iPad Air M2 अधिक पावर-एफिशिएंट चिपसेटसह येतो.
11-इंचाच्या iPad Air M3 ची फक्त वाय-फाय मॉडेलची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. तर Wi-Fi + सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 74,900 रुपये आहे. मोठ्या 13-इंचाच्या iPad Air Wi-Fi मॉडेलची किंमत 79,900 रुपये आणि Wi-Fi + सेल्युलर वर्जनची किंमत 94,900 रुपये आहे. कंपनी विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट आणि ऑफर्ससह हा नवीन iPad Air M3 ऑफर करत आहे. कंपनीने दिलेल्या या डिस्काऊंटनंतर विद्यार्थी 11 इंचाचा iPad Air 54,900 रुपयांना आणि 13 इंचाचा मॉडेल 74,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतील. (फोटो सौजन्य – X)
नवीन Magic Keyboard 11 इंचाच्या वर्जनसाठी 26,900 रुपये आणि 13 इंचाच्या व्हेरिअंटसाठी 29,900 रुपयांत उपलब्ध आहेत. एजुकेशनल डिस्काउंटसह, या किमती अनुक्रमे 24,900 आणि 27,900 रुपयांपर्यंत कमी होतील. भारतातील ग्राहक नवीन iPad Air ची प्री-ऑर्डर करू शकतात. ज्यामुळे विक्री सुरु होताच त्यांना हा नवीन iPad Air खरेदी करता येणार आहे.
Introducing the newest iPad Air! pic.twitter.com/10uCdhRLUw
— Tim Cook (@tim_cook) March 4, 2025
iPad Air M2 मॉडेलची घोषणा 2022 मध्ये करण्यात आली होती, त्यामुळे नवीन अपग्रेडची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे, कारण कंपनीने नवीन iPad Air M3 लाँच केले आहे. नवीन iPad Air मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे M3 चिप, जी Apple च्या मते, M1-पावर्ड iPad Air च्या जवळपास दुप्पट कामगिरी देते आणि मागील A14 Bionic मॉडेलपेक्षा 3.5 पट वेगवान आहे. या स्पीड इंप्रूवमेंटमुळे कंटेंट क्रिएशन आणि गेमिंग सारख्या कामांमध्ये चांगली कामगिरी मिळेल. M3 चिपच्या एडवांस्ड ग्राफिक्स आर्किटेक्चरसह, Apple नवीन iPad Air ला एक शक्तिशाली पण पोर्टेबल डिव्हाइस म्हणून स्थान देत आहे.
Apple ने iPad Air साठी एक नवीन Magic Keyboard देखील सादर केला आहे, जो iPad Pro च्या कीबोर्डसारखाच आहे परंतु काही वेगळ्या वैशिष्ट्यांसह येतो. यात 14-की फंक्शन रो आहे, ज्यामध्ये स्क्रीन ब्राइटनेस आणि व्हॉल्यूम एडजस्ट करण्यासाठी शॉर्टकट आणि चांगल्या नेव्हिगेशनसाठी मोठा ट्रॅकपॅड समाविष्ट आहे. तथापि, iPad Pro च्या Magic Keyboard च्या विपरीत, या वर्जनमध्ये अॅल्युमिनियम हिन्ज वगळता कमी प्रीमियम साहित्य वापरले जाते.
BGMI Pro Tips: तुम्हालाही गेमप्ले सुधारून PUBG चा प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच करा या 5 ढासू सेटिंग
नवीन iPad Air मॉडेल्स iPadOS 18 ला सपोर्ट करतात आणि अॅडवांस्ड कॅमेरे, जलद 5G कनेक्टिव्हिटी आणि Apple Pencil Pro आणि Apple Pencil (USB-C) सह कॉम्पॅटिबिलिटीसह येतात. नवीन Magic Keyboard हा iPad Air ला अधिक वर्सेटाइल बनवतो, iPad Pro अॅक्सेसरीजपेक्षा कमी किमतीत अधिक क्षमता देतो असा दावा अॅपलने केला आहे.