केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा
स्मार्टफोन ब्रँड Vivo त्यांच्या लोकप्रिय T-सीरीजअंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Vivo T4 Pro या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, Vivo T4 Pro भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. हे आगामी मॉडेल Vivo T3 Pro चे अपग्रेड वर्जन म्हणून लाँच केले जाणार आहे. हे नवीन मॉडेल गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या Vivo T3 Pro चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. स्मार्टफोन कोणत्या फीचर्ससह लाँच केला जाणार आहे, याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील काही माहिती समोर आली आहे.
कंपनीने माहिती दिली आहे की, Vivo T4 Pro भारतात 26 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विकला जाईल, जिथे त्यासाठी एक वेगळी मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे. हा फोन निळ्या आणि सोनेरी रंगाच्या पर्यायांमध्येल खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन स्मार्टफोन क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन अत्यंत स्लिम असणार आहे आणि त्याची जाडी केवळ 7.53mm असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snaprdagon 7 Gen 4 चिपसेट आणि दमदार 6,500mAh बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये इमेजिंग आणि प्रोडक्टिविटीला अधिक चांगलं बनवण्यासाठी AI-बेस्ड टूल्सचा देखील वापर करण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX882 टेलीफोटो लेंस दिला जाणार आहे, जो 3X ऑप्टिकल जूम सपोर्ट करणार आहे. कॅमेरा मॉड्यूल मागील पॅनेलच्या वरच्या-डाव्या कोपऱ्यात गोळीच्या आकाराच्या डिझाइनसह ठेवलेला आहे.
गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Vivo T3 Pro फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट आणि 5,500mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony प्रायमरी कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 6.77-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB+256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
Vivo T4 Pro मध्ये बॅटरी आणि प्रोसेसर दोन्ही अपग्रेड केले गेले आहेत आणि कॅमेऱ्यात टेलिफोटो लेन्सचा एक नवीन पर्याय देखील देण्यात आला आहे. हे स्पष्ट आहे की Vivo T4 Pro मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स आणत आहे आणि हा फोन टी-सीरीजला अधिक मजबूत बनवू शकतो.