OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला....
जगभरातील मोठ्या कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत. अलीकडेच टेस्लाने भारतात एंट्री केली आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या OpenAI ने देखील आता भारतात एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. OpenAI ने जगातील पहिले AI चॅटबोट ChatGPT लाँच केले आहे. कंपनीने भारतात पहिले पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. कंपनी यावर्षी नवी दिल्लीमध्ये पहिले ऑफीस सुरु करण्याची तयारी केली आहे.
यूजर्सच्या संख्येच्या बाबतीत भारत हा OpenAI साठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने खास भारतीय ग्राहकांसाठी ChatGPT Go नावाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. OpenAI भारतातील युजर्ससाठी सतत नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असतो. OpenAI च्या भारतातील युजर्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आता OpenAI भारतात त्यांचं ऑफीस सुर करणार आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांचे नवीनतम एआय मॉडेल चॅटजीपीटी 5 लाँच करताना सांगितले की, भारत हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा वापरकर्ताबेस आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI चे म्हणणं आहे की, स्थानिक संघासाठी अधिकृतपणे हायरिंग सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही टीम स्थानिक भागीदार, सरकार, व्यवसाय, विकासक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध मजबूत करण्यासाठी काम करेल. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारतात AI चे प्रचंड युजर्स आहे. ChatGPT चे युजर्स देखील भारतात प्रचंड आहेत. जागतिक AI लीडर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी भारताकडे आहेत, जसे की उत्तम तंत्रज्ञान प्रतिभा, जागतिक दर्जाची डेव्हलपर इकोसिस्टम आणि इंडियाएआय मिशनद्वारे मजबूत सरकारी पाठिंबा. या सर्व गोष्टींमुळे भारत AI ChatGPT साठी एक चांगली बाजारपेठ बनू शकते.
OpenAI साठी भारत एक महत्वपूर्ण बाजारपेठ आहे. हे लक्षात घेऊन, कंपनीने 399 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला. या कंपनीने पहिल्यांदाच एखाद्या देशासाठी विशिष्ट प्लॅन लाँच केला. भारतीय यूजर्स ChatGPT च्या फ्री वर्जनसोबतच प्लस आणि प्रो प्लॅन देखील अॅक्सेस करू शकणार आहेत. परंतु या नवीन प्लॅनमुळे लोकांना कमी मासिक खर्चात एडवांस्ड टूल्सचा लाभ मिळेल. कंपनी भारतातील प्रचंड इंटरनेट वापरणाऱ्या लोकसंख्येवर लक्ष ठेवून आहे.
ChatGPT Go प्लॅनची किंंमत 399 रुपये प्रति महीना आहे, ही किंमत प्लस सब्सक्रिप्शन प्लॅनच्या 1,999 रुपये प्रति महीन्यांच्या तुलनेत फार कमी आहे. नवीन प्लॅनमध्ये, यूजर्सना 10 पट अधिक कॅपेसिटी, डेली इमेज जनरेशन, फाइल अपलोड आणि पर्सनलाइज्ड रिस्पॉन्ससाठी जास्त काळ मेमरी असे फायदे मिळतात. ही योजना GPT-5 समर्थित आहे. हे कंपनीचे नवीनतम मॉडेल आहे आणि भारतीय भाषांना अधिक चांगल्या प्रकारे समर्थन देते.