फोटो सौजन्य -iStock
लोकप्रिय आणि जगप्रसिध्द टेक कंपनी Apple ने त्यांच्या Iphone युजर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. Apple ने दिलेला हा इशारा Pegasus स्पायवेअरबाबत आहे. Apple ने सांगितलं आहे की, Iphone युजर्सना Pegasus स्पायवेअरचा धोका आहे. Pegasus स्पायवेअरचा वापर करून Iphone युजर्सवर हल्ला होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर Iphone हॅक होऊ शकतो आणि त्यामुळे Iphone युजर्सचा फोनमधील डेटा लिक होऊ शकतो. हा इशारा Apple ने भारतासह 98 देशांमध्ये जारी केला आहे. त्यामुळे युजर्सनी काळजी घेणं गरजेचं आहे.
युजर्सच्या Apple आयडीशी लिंक केलेल्या आयफोनवर रिमोट ऍक्सेस मिळवण्यासाठी Pegasus स्पायवेअरचा हल्ला होण्याची शक्यता आहे. Apple ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतातील iPhone युजर्सना रात्री 12.30 वाजताच्या सुमारास Apple चा एक मेल आला होता. या मेलमध्ये म्हटलं होतं की, iPhone युजर्सना Pegasus स्पायवेअरचा धोका आहे. हा स्पायवेअर तुमच्यावर हल्ला करून तुमचा iPhone हॅक करू शकतो. ज्यामुळे तुमच्या फोनमधील माहिती लिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युजर्सनी कोणतीही अज्ञात लिंक वर क्लिक करू नये. Pegasus स्पायवेअर एखाद्या Apple सॉफ्टवेअरप्रमाणे कार्य करते. या स्पायवेअरच्या मदतीने तुमचा पर्सनल डाटा लिक होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सावध राहणं गरजेचं आहे.
Apple ने असा इशारा देण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये कंपनीने 92 देशांतील iPhone युजर्ससाठी असाच इशारा दिला होता. Pegasus स्पायवेअरबाबत Apple ने आपल्या पेजवर माहिती दिली आहे. इतर सायबर गुन्हेगारी कारवायांपेक्षा हा हल्ला अधिक गंभीर असू शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. असे हल्ले फार दुर्मिळ आहेत कारण यामुळे कंपनीला लाखो डॉलर्सचे नुकसान होते. असे हल्ले मोजक्याच डीवाइसेसवर होतात. याचा परिणाम बहुतांश लोकांवर होणार नाही, असेही ॲपलने म्हटले आहे. याद्वारे काही विशिष्ट लोकांना टार्गेट केले जात आहे. Pegasus स्पायवेअर एखाद्या Apple सॉफ्टवेअरप्रमाणे कार्य करते. या स्पायवेअरच्या मदतीने तुमचा पर्सनल डाटा लिक होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सावध राहणं गरजेचं आहे.
हल्ल्यापासून असे करावे संरक्षण
हा हल्ला टाळण्यासाठी Apple ने युजर्सना लॉकडाउन मोड चालू करण्यास सांगितलं आहे. लॉकडाउन मोड हे iPhone चे खास फीचर आहे, जे या प्रकारचे स्पायवेअर हल्ले टाळण्यासाठी वापरले जाते. हा मोड चालू केल्यानंतर, युजर्स अनेक इतर खास फीचर्स वापरू शकणार नाहीत.या फीचरमुळे तुमचा iPhone अधिक सुरक्षित राहण्यासाठई मदत होईल. त्यामुळे हा पर्याय ऑप्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच कंपनीने अज्ञात लिंक्स आणि अटॅचमेंट्सवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.