फोटो सौजन्य: iStock
कावासाकी भारतीय ऑटो बाजारात अनेक सेगमेंटमध्ये बाईक विकते. कंपनी 300 सीसी सेगमेंटपासून ते अनेक सुपरबाईक्सपर्यंतच्या बाईक ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात काही विशिष्ट बाईक्सच्या खरेदीवर लाखो रुपयांची सूट देत आहे. चला जाणून घेऊयात, प्रत्येक बाईक खरेदी केल्यावर तुमची किती रुपयांची बचत होईल?
‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…
कावासाकी भारतातील 300 सीसी सेगमेंटमध्ये Ninja 300 ऑफर करते. कंपनी या महिन्यात या बाईकच्या खरेदीवर 28000 रुपयांचे डिस्काउंट देत आहे. ही ऑफर उर्वरित 2024 युनिट्सवर उपलब्ध आहे.
कावासाकीच्या निंजा सिरीजमधील 500 सीसी क्षमतेच्या या बाईकवर या महिन्यात खरेदी केल्यास तब्बल 17 हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. ही ऑफर 2025 मधील शिल्लक युनिट्सवर लागू करण्यात आली आहे.
कावासाकीकडून निंजा 650 मॉडेलवरही आकर्षक डिस्काउंट दिली जात आहे. या महिन्यात ही बाईक खरेदी केल्यास 27 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. ही ऑफर 2025 मधील उर्वरित युनिट्ससाठी लागू आहे.
या महिन्यात ZX-6R खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. 2026 च्या युनिट्सवर 83 हजार रुपये किमतीचा ओहलिन्स स्टिअरिंग डॅम्पर मोफत देण्यात येत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे.
निंजा 1100SX च्या 2025 युनिट्सवरही आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यास 1.43 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे.
जेडएक्स-10आर च्या 2026 युनिट्सवरही मोठी ऑफर देण्यात येत आहे. या सुपर बाईकवर तब्बल 2.50 लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते.
महत्वाची सुचना: वरील डिस्काउंट ऑफर तुमच्या जवळील शोेरुमनुसार बदलू शकते.






